Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पिंपरी, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील (pimpri chinchwad by election) ‘आप’च्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरण्यास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे (Pimpri-Chinchwad Executive President Chetan Bendre) यांना एक वर्षासाठी पक्षातून निलंबित (Suspended from party) करण्यात आले आहे. (pune politics)
दरम्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे (State Secretary Dhananjay Shinde) यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. ‘आप’चे राज्य उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे प्रभारी हरिभाऊ राठोड (State Vice President of AAP, Pimpri-Chinchwad in-charge Haribhau Rathod) यांनी ही कारवाई केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपने मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा अधिकृत फॉर्म ‘बी’ अपूर्ण असल्याने पाटील यांचा अर्ज बाद झाला. पाटील यांना ‘एबी’ फॉर्म कोरा देण्यात आला. तसेच उमेदवारी अर्जावर दहा अनुमोदकांच्या स्वाक्ष-या घेतल्या नाहीत. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. घोळामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा जाब कार्यकर्त्यांनी विचारला असता बेंद्रे यांनी एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (pune politics)
‘आप’चे प्रभारी हरिभाऊ राठोड म्हणाले,”आपचे उमेदवार मनोहर पाटील यांच्या अर्जावर आवश्यक असलेल्या दहा जणांच्या स्वाक्ष-या घेतल्या नाहीत. हे सगळे जाणीवपूर्वक अर्ज बाद झाला पाहिजे यासाठी केले की काय, असा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित केले.”
कार्यकर्त्यांनी अर्जावर स्वाक्ष-या का घेतल्या नाहीत, असे विचारले असता चिडून बेंद्रे यांनी एका कार्यकर्त्याला मारहण केली. यामुळे पक्षाची बदनामी झाली. “राज्य समितीकडून जो काही निर्णय येईल तो मला मान्य राहील. मी पक्षाची अधिकृत भूमिका येण्याची वाट बघत आहे. कोणालाही मारहाण केली नाही.” असे बेंद्रे म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84