Type Here to Get Search Results !

"धायरीची पाणी टंचाई, दूषित पाणी आणि टँकर" ही समस्या नाही; चुकीचे नेतृत्व हीच खरी समस्या: पाणी परिषदेतील सूर

 


पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सर्वसामान्य नागरिकांचा पाणी, रस्ते, स्वच्छता या आपल्या समस्या नाहीत तर हे प्रश्न सोडवणारा योग्य उमेदवार, पक्ष आपण निवडून दिला नाही ही आपली समस्या आहे. असे आम आदमी पार्टीचे राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया (Aam Aadmi Party State Joint Incharge Gopal Italia) यांनी सांगितले. पाणी प्रश्न संदर्भात धायरी (Dhayari) येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पाणी परिषदेच्या (pani parishad) वेळी ते बोलत होते. (pune politics)

 

यावेळी सहप्रभारी महाराष्ट्र राज्य गोपाल इटालिया, महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा राजुरे (Maharashtra State Coordinator Ranga Rajure), महाराष्ट्र राज्य संघटक विजय कुंभार (Maharashtra State Organizer Vijay Kumhar), राज्य सचिव धनंजय शिंदे (State Secretary Dhananjay Shinde), पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत (Pune District President Mukund Kirdat), शहर समन्वयक अभिजीत मोरे (Pune City Coordinator Abhijeet More), पाणी परिषद आयोजक आणि धायरी मधून आप चे इच्छुक उमेदवार धनंजय बेनकर (Pani Parishad organizer and aspiring candidate of AAP from Dhairi Dhananjay Benkar), आप युवा राज्य संघटक संदीप सोनवणे (AAP Youth State Organizer Sandeep Sonwane) हे उपस्थित होते.

 

त्यासोबतच शहर संघटक एकनाथ ढोले (City Organizer Eknath Dhole), शहर संपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर (City Liaison Chief Prabhakar Kondhalkar), आप मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे (AAP media chief Sudarshan Jagdale), जल हक्क आंदोलन समिती अध्यक्ष आबासाहेब कांबळे (Jal Haqk Andolan samiti President Abasaheb Kamble), किशोर मुजुमदार (Kishore Mujumdar), प्रीतम कोंढाळकर (Pritam Kondhalkar), राजाभाऊ बेनकर (Rajabhau Benkar), राहुल बेनकर (Rahul Benkar), संदीप बेनकर (Sandeep Benkar) आदी उपस्थित होते.

 

यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने जलहक्क आंदोलन समितीच्या पाणीपुरवठा प्रश्न बाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्या संदर्भात माहिती देण्यात आली. शहरात असलेली अपूर्ण पाणीपुरवठ्याची कामे, चाळीस टक्के पाणी गळतीच्या नावाखाली होत असलेली पाणी चोरी, तसेच समाविष्ट गावांना दररोज पाणी मिळत नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.

 

प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे म्हणाले,”स्मार्ट सिटी मध्ये पाणी मिळत नसेल तर याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. नागरिकांनी आम आदमी पार्टी सोबत रस्त्यावर उतरून स्वतःचा पाणी प्रश्न सोडवून घ्यावा.

विजय कुंभार यांनी सांगितले कि,”या देशाचे मालक जनता आहे, प्रशासन काम करत नसेल, सध्याचे नेते काम करत नसतील तर नेते बदला. आप ला या वेळी संधी द्या. पुणे शहर टँकर मुक्त करू.”

यावेळी धायरी गाव परिसरातील महिलांनी आपला पाणी प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित केला. फक्त पाईपलाईन व टाक्यांवर (Pipelines and tanks) खर्च नको तर त्यामध्ये पाणी द्या असा प्रश्न यावेळी मांडण्यात आला. या कार्यक्रमाला धायरी गाव परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय बेनकर यांनी केले होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.