पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील
बहुतांशी प्रत्येक निवडणुकीला पुणेरी पाट्यांची संकल्पना तेवत ठेवणाऱ्या कसबा
पेठेत (kasba peth), विधानसभा
पोटनिवडणूकीच्या (Assembly by-elections) पार्श्वभूमीवर
पुन्हा एकदा पुणेरी पाट्या (puneri pati) अर्थात पोस्टर
(poster) लावण्यात आलेले असून, ते कोणी लावले
ते समजत नसले तरी, या पोस्टर मुळे कोणाचे “पुण्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर” वितुष्ठ निर्माण
करण्याचे प्रयत्न? तर नाहीत ना असा प्रश्न या निमित्ताने
उपस्थित होऊ लागला आहे. (kasba peth elections)
कसबा
विधानसभा पोटनिवडणूकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान शहरात 'कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर
बापटांचा का... ?' असा प्रश्न विचारणारे पोस्टर्स लावण्यात
आले आहेत (poster in Kasba Peth). या पोस्टर्समुळे राजकीय
वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (pune politics)
कसबा
पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane)
यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून
रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची घोषणा
करण्यात आली आहे. भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी
देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला
भाजपने उमेदवारी दिली नाही. यानंतर आता कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारीवरून पुण्यात
फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
या
पोस्टरवरती "कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का...??? समाज
कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार" असा
मजकूर लिहण्यात आलेला आहे. हे फ्लेक्स
(flex) पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान हा
फ्लेक्स नेमका कोणी लावला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले
नसले तरी, अशा फलकांमुळे पुण्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर
यांच्यामध्ये वाढत असलेली दरी आणखीन वाढू नये, अशा
प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे.
Kasba Peth
By-Election
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84