Type Here to Get Search Results !

जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही; दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मुलाची भावनिक पोस्ट

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चिंचवडचे (PCMC) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (late MP laxman jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (ashwini jagtap) आणि लहान भाऊ शंकर जगताप (Shankar jagtap) या दोघांनी भाजपकडून (BJP) पोटनिवडणुकीसाठी अर्ज घेऊन भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. यानंतर जगताप कुटुंबात वाद आहेत अशी चर्चा होऊ लागली होती. आता या सर्व चर्चेवर लक्ष्मण जगतापांचा मुलगा आदित्य जगतापने (Aditya jagtap) फेसबुकवर पोस्ट करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (pune politics)

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी आणि भाऊ शंकर यांच्यात उमेदवारीवरून वाद सुरु असल्याचे समोर आले होते. आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाला एक महिना उलटत असतानाच कुटुंबातील वादाची चर्चा समोर येत आहे.

 

त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण जगताप यांचा मुलगा आदित्यने फेसबुकवर कुटुंबाच्या फोटोसह जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.अशा आशयाची एक पोस्ट केली आहे. आदित्यच्या या भावनिक पोस्टनंतर या वादावर पडदा पडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

आदित्य जगतापने आपल्या फेसबुकवर (facebook post) एक भावनिक पोस्ट केली आहे. आम्हाला जगातील कोणतीही शक्ती वेगळे करू शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत, असा आशय या पोस्टमध्ये आहे. यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही त्यांनी अपलोड केलेले आहेत.

 

चिंचवड आणि कसबा पेठ (kasba peth) मतदार संघात अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र सर्व पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. सर्वच पक्षात इच्छूकांची मोठी यादी आहे. त्यातही महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.