Type Here to Get Search Results !

नारायण पेठेत 'ते' फ्लेक्स लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात सध्या कसबा विधानसभा पोट निवडणुकीची (kasba vidhan sabha by election) जोरदार तयारी सुरू आहे. या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याने येथील ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच नारायण पेठेतील (narayan peth) मोदी गणपती मंदिराजवळ (Modi Ganapati Mandir) ब्राह्मण समाज नाराज असल्याचे काही फ्लेक्स (Flex) लागल्याने या फ्लेक्सवरून खळबळ माजली होती.

“आमचेही ठरले, धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार NOTA” अशा वर्णनाचा फ्लेक्स मोदी गणपती जवळील विजेच्या खांबाला लावला होता. ब्राह्मण समाज व इतर समाज यांच्यात तेढ अथवा शत्रुत्वाच्या देशाच्या किंवा दुष्काळाच्या भावना हेतुपुरुष पर वाढविण्याच्या उद्देशाने हा फ्लेक्स लावल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर आता हे फ्लेक्स लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण राजेंद्र शिंदे (Police constable Kiran Rajendra Shinde) यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांनीही पुण्यात लागलेल्या या फ्लेक्सवरून भाष्य केले होते. “हे बॅनर ब्राह्मण समाजाने लावले नाहीत. हे बॅनर कोणी लावले ते लवकरच सर्वांसमोर येईल.” असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बरुरे (Sub-Inspector of Police Barure) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.