Type Here to Get Search Results !

बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातील इतर मतदारसंघाच्या विकासाकडे का लक्ष दिले नाही; विजय शिवतारे यांचा सवाल

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोणत्याही परिस्थितीत पुरंदरचे नियोजित विमानतळ (Purandar Airport) होणारच असून आता 80 टक्क्यांहून अधिक लोक जमिनी देण्यासाठी तयार असल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दिली.

 

बारामतीत (Baramati) आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,"पुरंदर विमानतळ होणे ही गरज आहे, 15 जिल्ह्यांसाठी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उपयुक्त ठरणार आहे. त्या बाबत आता सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव असून आता बहुसंख्य जमिनमालक आता जमीन देण्यास तयार आहेत. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील असून शेतक-यांना चांगला मोबदला मिळेल, याची आम्ही काळजी घेऊ."

विजय शिवतारे विधानसभा लढविणार की लोकसभा असे विचारता या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच घेतील, त्यांचा आदेश आपण मान्य करु, असे त्यांनी नमूद केले.

शिंदे फडणवीस सरकारने (sinde fadanvis government) गेल्या काही महिन्यात जी विकासाची भरीव कामे केली आहेत, ती लोकांपर्यंत पोहोचविण्याची कामे मी करत आहे. बारामतीच्या विकासाबाबत फक्त बारामतीच सर्व काही नाही, लोकसभा मतदारसंघातील इतर मतदारसंघाच्या विकासाकडे का लक्ष दिले नाही, असा सवाल त्यांनी केला.

 

पुढे ते म्हणाले,"राष्ट्रवादीमध्ये (rashtravadi) तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता कोणी असेल तर अजित पवार (Ajit Pawar) आहेत यात वाद नाही. युवकांना निवडणून आणणारे आणि बारकाईने प्रत्येक गोष्ट पाहणारे नेते अजित पवार आहेत. मी जरी त्यांचा विरोधक असलो तरी त्यांच्या काही गुणांचा मी प्रशंसक आहे, माझ्याविरुध्द ते बोलले तरी त्यांच्या विरुध्द मी बोलत नाही, कार्यकर्त्याला शोधून त्याला ताकद देत मोठे करण्यासह त्याला निवडून आणण्यासाठी जे करावे लागते त्यात महाराष्ट्रात अजित पवारांइतका मोठा माणूस दुसरा कुणी नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस अजितदादांनी केलेला उठाव हा पक्का होता हे मी स्वताः पंधरा ते वीस आमदारांच्या तोंडून ऐकलेले आहे. त्या मुळे दादांवर आमदार व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे हे नक्की."

"बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नेहमीच नुरा कुस्त्या झाल्या. या मतदारसंघातून लोकसभा लढण्यासाठी यापूर्वीच इच्छूक असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील. बारामती हे मतदारसंघाचे नाव बदलून ते पुणे दक्षिण असे करावे.अशी आग्रही मागणी करणार असल्याचे यावेळी शिवतारे म्हणाले.

तसेच,”बारामती लोकसभा मतदारसंघाऐवजी पुणे दक्षिण मतदारसंघ असे नाव करावे, अशी मागणी मी केली आहे. असेही शिवतारे यांनी सांगितले. बारामती म्हणजे फक्त बारामती विधानसभा मतदारसंघ नाही हेच पवार कुटुंबियांच्या लक्षात येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. बारामतीच्या टंचाईग्रस्त गावात आजही पिण्याचे पाणी उन्हाळ्यात मिळत नाही मग कसला विकास झाला.” असे ते म्हणाले.

 

बारामतीचा विकास म्हणजे शहराचा विकास आहे का, तालुक्यातील 39 गावे अद्याप पाण्याविना आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसी त्यांनी घरावर काळे झेंडे फडकावले होते. पंतप्रधानांसह (Prime Minister) मोठे नेते आणत शहर व परिसराचा विकास दाखवला जातो. प्रत्यक्षात तालुक्याचा विकास झाला आहे का, असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना केला.

शिवतारे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीकडे यावेळी लक्ष वेधले. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे (Shiv Sena Party District President Surendra Jeware) यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले,”खासदारांनी केंद्राकडून ईएसआयसी हॉस्पिटल बारामतीसाठी मंजूर करून आणले. वास्तविक त्यासाठी पुरंदर अथवा खेड शिवापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरले असते. प्रत्येक विकासाची बाब बारामतीला आणली जात आहे. दौंड (Daund), इंदापूर (Indapur), भोर (Bhor), पुरंदरवर (Purandar) त्यातून अन्याय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रेल्वेची कनेक्टिव्हीटी असलेल्या दौंडमध्ये झाले असते तर मोठ्या प्रमाणावर तेथील विकास झाला असता. परंतु ते होऊ दिले गेले नाही. बारामतीला बसस्थानकासाठी 220 कोटी मिळतात. पंरतु फुरसुंगी (Fursungi), उरुळी देवाची (Uruli Devachi) पाणी योजनेसाठी येथील नेतृत्वाने 25 कोटी मिळू दिले नाहीत. आता-आता सत्तांतरानंतर तो निधी आम्हाला मिळाला.” असे ते म्हणाले.

“शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे 18 तास काम करण्याची दूरदृष्टी आहे. पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडले. आमच्या पक्षावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला जात आहे. खोके सरकार म्हणून संभावना केली जात आहे. मागील निवडणूक भाजप-सेनेला स्पष्ट कौल दिला असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वाथार्पोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे खरे गद्दार कोण हे जनतेला कळाले आहे, असे शिवतारे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या असून सरकार निवडणूकांना भित असल्याच्या टीकेवर ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रवर्गाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. तो मिळाला की लागलीच निवडणुका होतील,.” असे देखील शिवतारे यांनी स्पष्ट केले.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.