Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):
नव्याने महापालिकेत समाविष्ट गावातील निंबाळकरवाडी गावठाणातील (Nimbalkarwadi
Gavthan) अनेक वर्षापासून असलेला प्रलंबित रस्त्याचा प्रश्न
गावकऱ्यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे.
गावठाणांतून समर्थगड, सरहद
संस्थेकडे (Samarthgad sarhad sanstha) जाणारा हा रस्ता
अत्यंत अरुंद (short) होता. या रस्त्यावरून एकच
चारचाकी मोटार जाणे शक्य होते. तसेच हा रस्ता सुरवातीला चढाचा असल्याने अपघाताची
(accident) शक्यता होती. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते.
अशावेळी गावकऱ्यांनी पुढाकार घेत स्वतःची जागा सोडत हा रस्ता रुंद (broad) करुन घेतला आहे. 8 ते 10 फूट
असणारा हा रस्ता आता 20 ते 22 फूट रुंद
होणार आहे.
रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणे कठीण होते. मात्र, हा रस्ता वाढविण्यात आल्याने वाहनचालकांना मार्ग सोयीचा झाला
आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामध्ये 14 ते 15 जागा मालकांनी आपली जुनी कच्ची-पक्की घरे
स्वतःच्या स्व-इच्छेने पाडण्यास परवानगी दिली. किमान अर्ध्या किलोमीटरवरील गावातील
गावकऱ्यांची घरे पाडण्यात आली आहेत.
हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी माजी उपसरपंच अजित निंबाळकर (Former Upsarpanch Ajit Nimbalkar), संतोष बालवडकर (Santosh
Balwadkar), रामदास खोपडे (Ramdas Khopde), किरण
निंबाळकर (Kiran Nimbalkar) यांनी पुढाकार घेऊन सहकार्य
केले.
यामध्ये प्रामुख्याने अमोल निंबाळकर (amol nimbalkar), एकनाथ भाटे (eknath
bhate), आबासाहेब आखाडे (aabasaheb akhade), तानाजी निंबाळकर (tanaji nimbalkar), सतीश
निंबाळकर (satish nimbalkar), दिलीप निंबाळकर
(dilip nimbalkar), काशिनाथ भाटे (kashinath bhate), मनेश सणस (mansh sanas), दत्ता सणस (datta
sanas), पांडुरंग बालवडकर (pandurang balwadkar), अनिल निंबाळकर (anil nimbalkar), हौसाबई
निंबाळकर (housabai nimbalkar), सनी निंबाळकर
(sani nimbalkar), कैलास निंबाळकर (kailas nimbalkar), निर्मल डांगी (nirmal dangi) या जागामालकांनी
कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता रस्त्यासाठी जागा सोडली आहे.
याबाबत
गुजर-निंबाळकरवाडीचे (gujar-nimbalkarwadi)
माजी उपसरपंच अजित निंबाळकर म्हणाले कि,”अनेक वर्षापासून रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी अडचण होत होती. तसेच
अपघाताची शक्यता असल्याने रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. यावेळी आम्ही पुढाकार
घेऊन रस्त्यात जागा येणाऱ्या प्रत्येक जागा मालकाला जागा सोडून रस्ता मोठे करणे
किती गरजेचे आहे हे पटवून दिले. जागामालक तयार झाल्यानंतर आम्ही रस्ता करून
घेण्याचे काम सुरु केले आहे. आता जवळपास हा रस्ता 20 फूट
रुंद झाला आहे.”
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84