स्थानिकांची टोलमाफी रद्द करत असल्याबद्दल भोर-वेल्हे (bhor-velhe) तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. टोल प्रशासनाने स्थानिकांना टोलमाफी दिली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे. यामध्ये भोर, वेल्हे, हवेली व पुरंदर तालुक्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
टोलवसुलीसाठी सक्ती केल्यास स्थानिकांकडून टोलनाक्यावर वाहनचालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 1 फेब्रुवारीलाच आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तालुक्यातील कॉंग्रेस (congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, भारतीय जनता पार्टी (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने स्थानिक टोलमाफीसाठी टोलनाक्यावर पुन्हा आंदोलन (strike) करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठवड्यापासून स्थानिक वाहनचालकांना टोलनाक्यावर त्रास दिला जात असून वाहनाचे आरसी बुक आणि मालकाचे आधार कार्ड याची मागणी केली जात आहे. टोल दिल्याशिवाय वाहन पुढे जाणार नसल्याचे सक्तीने सांगितले जात आहे.
कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, शिवसेनेचे कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, आदित्य बोरगे, माऊली शिंदे, हनुमंत कंक, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे आदींनी याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) म्हणाले कि,"सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व टोलनाका कृती समितीच्या वतीने केलेल्या प्रयत्नांमुळे खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांना म्हणजे एमएच १२ आणि एम एच १४ क्रमांकाच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. परंतु, टोल प्रशासनाने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिकांना टोलची सक्ती केल्यास पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याशिवाय टोलनाका हटविण्यासाठी शासकीय स्तरावर बोलणी सुरु आहेत. आता त्यामुळे प्रशासनाने स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84