Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): धायरी फाटा चौकामध्ये (Dhayri phata chowk) मोठी शाळा आहे. शाळा भरताना आणि सुटल्यावर या चौकामध्ये विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते. रोजची वाहतुकीची गर्दी, रस्त्यावरची अतिक्रमण आणि बेशिस्त रिक्षावाले यामुळे या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हा धायरीफाटा धोकादायक बनल्याचे चित्र दिसते. (Pune Traffic)
वर्दळीचा हा चौक नेहमीच कोंडीत अडकलेला असतो. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे मात्र सर्वांचीच दमछाक होत आहे. त्यातच सध्या टॅंकरची संख्या वाढली आहे. पीएमपी बसथांबाही (Dhayri Bus Stop) या चौकातच आहे.
धायरी फाटा चौकात भाजी-फळ विक्रेते, पथारीधारक रस्त्यालगत जागा मिळेल तेथे व्यवसाय थाटत आहेत. रिक्षाचालक (Riksha Driver) मनमानी पद्धतीने कोठेही थांबतात. यामुळे अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होते.
याबाबत भाजपचे अतुल चाकणकर (BJP's Atul Chakankar) म्हणाले कि,“धायरी फाट्यावर सिग्नलची व्यवस्था त्वरित सुरू करावी. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगची आखणी करावी. किमान शाळेच्या वेळेत पोलीस कर्मचारी येथे नेमावा. प्रशासन अपघात होण्याची वाट बघत आहे की काय? एवढी उदासीनता धायरी फाट्यावर दिसून येते.”
v
“धायरी फाट्यावर गर्दीच्या वेळेस तातडीने पोलीस कर्मचारी उपलब्ध राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि विशेषतः बेशिस्तांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.” असे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Traffic Senior Police Inspector Pramod Waghmare) यांनी सांगितले.
तर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड (Pradeep Awad, Assistant Commissioner of Sinhagad Road Zonal Office) म्हणाले,”अतिक्रमण नियंत्रण विभागातर्फे रस्त्यावरील अतिक्रमणांवर नियमितपणे कारवाई केली जाते. विक्रेत्यांनीही थोडे समजून घेतले पाहिजे. रस्ता मोकळा सोडला पाहिजे म्हणजे धायरी फाटा चौकातील प्रश्न सुटेल.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84