Type Here to Get Search Results !

हडपसर भागातून जाणार असाल तर वेळीच मार्ग बदला; पुढील तीन दिवस प्रचंड वाहतूक कोंडीचा करावा लागणार सामना

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, pune traffic news, traffic jam in pune today)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल (Hadapsar Gadital Flyover) आजपासून 3 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 10 फेब्रुवारी ते रविवार 12 फेब्रुवारीपर्यंत पुणे ते सोलापूरच्या (Solapur) दिशेने जाणाऱ्या बाजूची उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. (traffic jam in pune today)

हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत (Hadapsar Transport Department) हडपसर उड्डाणपुलावरील पुणे ते सोलापूर व सासवडकडे (Saswad) जाणाऱ्या लेनवरुन जाणारी सर्व प्रकारची वाहतूक 10 फेब्रुवारी पासून 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे. सदर कालावधीत उड्डाणपुलावरुन सोलापूरकडून पुणेकडे व सासवडकडून पुणेकडे येणारी वाहतूक सुरु राहील. हडपसर उड्डाणपुलाच्या खालुन पुणे-सोलापूर रोड या पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांना करता येईल.

लोड टेस्ट (Load test) करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुणे महानगरपालिका (PMC) हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावर बांधण्यात आलेला हडपसर गांव ते गाडीतळ - जाणारा उड्डाणपुल धोकायदायक झाला असल्याने 5 फेब्रुवारी 2022 पासून वाहतूकीसाठी संपूर्ण बंद करण्यात आला होता. पुलावरुन जाणारी संपुर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवरुन (Service Road) वळवण्यात आली होती. सदर पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून सदरच्या पुलावर लोड टेस्ट करण्यासाठी पुलावरुन जाणारी वाहतूक बंद करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला कळवण्यात आलं आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.