Type Here to Get Search Results !

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीवर नवा उपाय; विद्यापीठातील शॉर्ट कट खुला

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गणेशखिंड रस्त्यावर (ganeshkhind road) मेट्रोचे (pune metro) काम सुरू असल्याने या भागात प्रचंड वाहतूक कोंडी (traffic) होत असल्याने आनंद ऋषिजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंध (aundh) कडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवली जाणार आहे. यास आज पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) (PUMTA) बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

त्यासाठी विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य गेट ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत (Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management) नवा रस्ता तयार केला जाणार आहे. दरम्यान हा रस्ता तयार होण्यास 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,”विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या आतून रस्ता तयार करण्यास परवानगी दिली आहे. तसेच याबाबत पुम्टाच्या बैठकीतही निर्णय झाला आहे. त्यानुसार गुरुवारी पाहणी करून रस्त्याचे काम लगेच सुरू होईल. यासाठी 15 दिवस लागणार आहेत. हा रस्ता झाल्यानंतर विद्यापीठ चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी होईल.”

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) (PMRDA) शिवाजीनगर ते हिंजवडी (shivajinagar to hinjwadi) या मेट्रोचे काम सुरू केले आहे. मेट्रोच्या कामाला गती आलेली असताना गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल (Multi-storied flyovers) उभारला जाणार आहे. हा पूल पुढील एका वर्षभरात बांधून तयार करून तो वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्याची तांत्रिक पडताळणीनंतरच त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

मात्र, विद्यापीठ चौक व त्याच्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे पाषाण रस्ता (pashan road), बाणेर रस्ता (baner road), औंध रस्ता (aundh road) या भागात वाहतूक कोंडी वाढलेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विद्यापीठ चौकातील कोंडी कमी करण्यासाठी विद्यापीठातून वाहतूक वळविल्यास दिलासा मिळेल अशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार पुणे महापालिकेने विद्यापीठ प्रशासनाला दोन महिन्यांपूर्वी पत्र पाठवले होते. त्यानुसार आज पुम्टाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Pune University chancellor Dr. Prafull Pawar) म्हणाले कि,“सामाजिक विषयांसाठी विद्यापीठ नेहमीच पुणेकरांसोबत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी निश्‍चितच आम्ही दोन पावले पुढे येऊ. महापालिकेने विद्यापीठातील रस्ता सार्वजनिक वापरासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली आहे.”

विद्यापीठ चौकात सर्वात जास्त वाहने एकत्र येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पाषाण व बाणेरवरूनही विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग नाही. ही करणे लक्षात घेता हा नवीन रस्ता आवश्‍यक आहे. यासोबतच औंध कडून येणाऱ्या वाहनांसाठी विद्यापीठातून पर्यायी मार्ग दिल्यास चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि दुचाकी, चारचाकी, तीनचाकी या हलक्या वाहनांसाठी विद्यापीठातील रस्ता खुला असेल. तसेच चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गेट (chaturshrungi police station gate) ते मुख्यगेटपर्यंत रस्ता तयार आहे. तर मुख्यगेट ते वैकुंठ मेहता (vaikunth mehta) या दरम्यान 175 मीटर लांबीचा आणि 6 मीटर रुंद रस्ता विद्यापीठाच्या आतून तयार केला जाईल.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.