Type Here to Get Search Results !

फक्त शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा म्हणून सुरु आहे विरोध; फुरसुंगी, उरुळी देवाची गावांची नगरपालिकाच व्हावी

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): फक्त शिंदे फडणवीस सरकारच्या (shinde fadanvis government) निर्णयाला विरोध करायचा म्हणून फुरसुंगी (fursungi) आणि उरुळी देवाची (uruli devachi) नगरपालिकेला विरोध करण्याचे राजकीय षडयंत्र आखले जात आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी सरकारच्या नगरपालिकेच्या निर्णयाचे स्वागतच केले असून, ग्रामस्थ पुणे महानगरपालिकेच्या चुकीच्या कर धोरणाला अगोदरच वैतागलेले आहेत. त्यामुळे फुरसुंगी, उरुळी देवाची गावांची नगरपालिकाच व्हावी अशी मागणी या गावांमधील दुसऱ्या गटाने केली आहे. (uruli-devachi and fursungi nagarpalika news)

नगरपालिका होण्याची मागणी करताना या गावांमधील ग्रामस्थांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. उदाहरणार्थ, ग्रामपंचायत काळात घराला 1350 रुपये कर होता, आता 18000 रुपये कर यायला लागला आहे. हा किती पटींनी अधिक कर आहे हे सांगायची गरज नाही. त्यामुळे पालिकेचा कर आम्ही भरलेला नाही, असे येथील ग्रामस्थांनी ‘चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.

गेल्या 5 वर्षात या गावांमध्ये ड्रेनेजचे झाकण बदलायला 15 - 15  दिवस लागत आहेत. 12 - 12 दिवस पाणी येत नाहीये. मयत पास मिळायला क्षेत्रीय कार्यालयात (Regional Office) 3 - 3 तास थांबावे लागत आहे. आम्ही पुणे महानगरपालिकेला कर देतोय, आतापर्यंत 119 कोटी रुपये कर घेतला, पण 10 कोटीची पण विकासकामे करत नाहीयेत. उलट कचरा डेपो मुळे आमच्या गावांचे जलस्त्रोत खराब झाले. त्याची भरपाई म्हणून गावे दत्तक घेऊन 10 कोटी निधी दिला जात होता, ते पण बंद केले आहेत.

एकूणच आता आम्हाला पुणे महानगरपालिका नको आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून येत असलेल्या नगरपालिकेचे स्वागत करत आहोत, अशा प्रकारची भूमिका विशाल हरपळे (Vishal Harpale), गणेश कामठे (Ganesh Kamathe), निलेश पवार (Nilesh Pawar), धनंजय कामठे (Dhananjay Kamathe), विनायक वारे (Vinayak Vare), पिंटू हरपळे (Pintu Harpale), महेश हरपळे (Mahesh Harpale), बाजीराव सायकर (Bajirao Saykar), अक्षय कामठे (Akshay Kamathe), ज्ञानेश्वर कामठे (Dnyanehswar Kamathe), किरण पवार (Kiran Pawar), संदीप हरपळे (Sandeep Harpale) यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.