Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, fursungi news)
पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे मधील स्व. सोनेरी आमदार रमेश वांजळे हायवे चौकातील (Soneri Aamdar Ramesh Wanjale Highway Chowk) मोबाईल शॉपीला (Mobile Shop) मंगळवार दि. 7 फेब्रुवारी 2023 रात्री 11 च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. यामध्ये दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने आग लागली तेव्हा आजूबाजूची गर्दी ओसरली होती, दुकाने बंद झालेली असल्याने मोठी हानी टळली. मात्र गेल्या तीन महिन्यात विजेशी संबंधित वस्तूची विक्री आणि दुरुस्ती होणाऱ्या या तिसऱ्या दुकानाला आग लागली असल्याने, या घटनांमागील कारणाचा शोध घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
वारजे हायवे चौक (Warje Highway Chowk) येथे मुख्य रस्त्यावर हे मातोश्री नावाचे पत्रा शेडचे मोबाईल दुकान आहे. मंगळवारी रात्री मोबाईल दुकानं बंद झाल्यानंतर 10:45 च्या सुमारास दुकानामधून धुराचे लोट येत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. यावेळी दुकानाला आग लागल्याची माहीती मिळताच वारजेतील कै. वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन केंद्राचे तांडेल आनिल कांबळे (Tandel Anil Kamble of Vasantrao Arjun Chaudhary Fire Station), ड्रायवर दत्तात्रय गोगावले (Driver Dattatraya Gogavle), फायरमन निलेश तागुंदे (Fireman Nilesh Tagunde), विकास ओव्हाळ (Vikas Ovhal), उमेश ताटे (Umesh Tate), आप्पासाहेब मिसाळ (Appasaheb Misal) यांच्या पथकाने पाण्याचा मारा करत काही क्षणातच आग विझवल्याने होणारी दुर्घटना टळली.
वारजे मध्ये नव्यानेच झालेल्या या अग्निशमन दलातील प्रशिक्षित जवानांनी (Fire Fighters) मोबाईल शॉपीची आग विझवत असतानां शेजारील दुकानांकडे आग सरकू नये, याची काळजी घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अन्यथा या आगीमुळे होणाऱ्या नुकसानाची व्याप्ती मोठी राहिली असती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84