Type Here to Get Search Results !

तब्बल १३ तोळे सोन्याचे दागिने पत्रावळी मध्ये गुंडाळून ठेवणे पडले महागात?

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): घरातील विवाह समारंभ (marriage) पार पडल्यानंतर एका कागदी ताटात काढून ठेवलेले तेरा तोळे सान्याचे दागिने (13 tolas og gold ornaments) दुसऱ्या दिवशी घरातील कचरा (garbage) गोळा करताना सदस्यांकडून कचरा समजून टाकून देण्यात आले. येरवडा (yerwada) येथील स्वातंत्र्यसैनिक नगरमध्ये (swatantrya sainik nagar) ही घटना घडली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने आणि कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे दागिने पुन्हा मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम चव्हाण (shubham chavhan) कुटुंबासह स्वातंत्र्यसैनिक नगरमध्ये राहतात. चार दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचे लग्न (wedding) होते. यामुळे घरात पाहुण्यांची गर्दी होती. विवाह समारंभ पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जानेवारी 2023 रोजी लग्नाची पूजा होती. पुजेचा कार्यक्रम संपल्यावर शुभम यांच्या आईने गळ्यातील तेरा तोळे सोन्याचे दागिने एका कागदी ताटात गुंडाळून ठेवले.

सकाळी घरातील कचरा देताना सोने गुंडाळलेला कागदही कचऱ्यात टाकून देण्यात आला. काही वेळाने सोन्याची शोधाशोध सुरू झाली. या वेळी गडबडीत कचऱ्यात सोने टाकल्याचे लक्षात आले. तासाभराने कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनावरील चालक विजय कापसे (driver vijay kapse) यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून गाडीत कचऱ्यासह सोने गेल्याचे सांगितले. तोपर्यंत गाडी डेपोत रॅम्पवर गेली होती. चालकाने त्वरित कचऱ्याची गाडी स्वातंत्र्यसैनिकनगरमध्ये माघारी आणून तेथे पूर्ण गाडी रिकामी केली.

आदर पूनावाला संस्थेचे कर्मचारी, चव्हाण कुटुंबीय आणि आठ मित्रांनी कचऱ्यात शोध घेतला असता सर्व दागिने परत मिळाले. दरम्यान, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडून याची दखल घेण्यात आली असून लवकरच कचरावेचक कामगारांचा सत्कार करणार असल्याचे सांगितले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.