Type Here to Get Search Results !

येत्या १४ मार्चपासून राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राज्यातील सरकारी कर्मचारी (Government employees) हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी (Demands) येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर (Indefinite strike) जाणार आहेत. या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेत्तर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. (State government employees on indefinite strike from March 14)

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे (Pune District President of State Government Employees Central Association Maruti Shinde) यांनी शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी 2023) याबाबतची घोषणा केली. या संपाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे (Deputy Collector Himmat Kharade) यांना निवेदन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे, आरोग्य विभागातील नंदकुमार गुडमेट्टी (Nandakumar Gudmetti of Health Department), संजय कडाळे (Sanjay Kadale), ससून रुग्णालयातील दिनेश कुचेकर (Dinesh Kuchekar of Sassoon Hospital), पाटबंधारे विभागातील कृष्णा साळवी (Krishna Salvi of Irrigation Department), सहकार विभागातील संध्या काजळे (Sandhya Kajle in Cooperative Department), प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महेश घुले (Mahesh Ghule of Regional Transport Office), जिल्हाधिकारी कार्यालयातील विनायक राऊत (Vinayak Raut of the Collector's office), निर्मला चौधरी (Nirmala Chaudhary), आशा बांदल (Asha Bandal) आदी विविध विभागातील कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.