Type Here to Get Search Results !

३ मार्च रोजी प्रदर्शित होणार अ‍ॅक्शनपॅक्ड 'रौंदळ'

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा 'रौंदळ' हा चित्रपट (raundal marathi movie) अखेर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 3 मार्च 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'रौंदळ' हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. यातील सर्वात मोठं कारण म्हणजे या चित्रपटातील भाऊसाहेब शिंदेचा (Bhausaheb Shinde) रावडी लुक... राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'ख्वाडा' (Khwada) आणि म्युझिकल लव्हस्टोरी असलेल्या 'बबन' (baban movie) चित्रपटानंतर 'रौंदळ'मध्ये पुन्हा एकदा डॅशिंग भाऊसाहेब दिसणार आहे. त्याच्या जोडीला नेहा सोनावणे (Neha sonawane) ही नवोदित अभिनेत्री मुख्य भूमिकेत रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलर आणि गीत-संगीताला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद पाहता 'रौंदळ' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. (raundal Marathi movie release date)

'रौंदळ'ची निर्मिती भूमिका फिल्म्स अँड एंटरटेनमेंट (Bhumika Films and Entertainment) या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी (Pramod Choudhary), भाऊ शिंदे (Bhau Shinde) आणि राईज बिझनेस ग्रुप (Rise Business Group) यांनी केली आहे. रवींद्र औटी (Ravindra Auti), संतोष औटी (Santosh Auti), कैलाश गुंजाळ (Kailash Gunjal) आणि संजय कुंजीर (Sanjay Kunjir) या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गजानन नाना पडोळ (Gajanan Nana Padol) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. टप्प्याटप्प्यानं वाढणारी उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम 'रौंदळ'च्या ट्रेलरनं केल्यानंतर आता संपूर्ण चित्रपट रसिकांच्या दरबारात सादर होणार आहे. या चित्रपटातील 'मन बहरलं...', 'भलरी...' आणि 'ढगानं आभाळ...' ही गाणी अगोदरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हर्षित अभिराज (Harshit Abhiraj) यांनी डॉ. विनायक पवार (Dr. Vinayak Pawar), बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) आणि सुधाकर शर्मा (Sudhakar Sharma) यांनी लिहिलेल्या गीतांना सोनू निगम (Sonu Nigam), जावेद अली (Javed Ali), स्वरूप खान (Swaroop Khan), दिव्य कुमार (Divya Kumar), वैशाली माडे (Vaishali Made), हर्षित अभिराज (Harshit Abhiraj), गणेश चंदनशिवे (Ganesh Chandanshive) यांच्या आवाजात स्वरसाज चढवला आहे.

महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील खरीखुरी वाटणारी साहसदृश्ये या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाईट मानला जात आहे. नव्या जुन्या कलाकारांची तगडी फळी कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यासाठी सक्षम आहे. या चित्रपटातही राजकारणाचे वेगळे पैलू पहायला मिळणार आहेत. हे राजकारण आहे प्रत्येक गावातलं, साखर कारखान्याच्या निवडणूकीतलं आणि त्या अन्यायाच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या प्रत्येक नायकाचं... सत्ता आणि व्यवस्थेविरोधातील अनोखा लढा यात अधोरेखित करण्यात आला आहे. आपल्या आणि इतरांच्या न्याय-हक्कासाठी लढणारा नायक रसिकांचं मन मोहून टाकणारा आहे. (raundal Marathi movie release date)

'रौंदळ'मध्ये संजय लाकडे (Sanjay Lakade), यशराज डिंबाळे (Yashraj Dimbale), सुरेखा डिंबाळे (Surekha Dimbale), शिवराज वाळवेकर (Shivraj Walvekar), गणेश देशमुख (Ganesh Deshmukh), सागर लोखंडे (Sagar Lokhande) आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. डिओपी अनिकेत खंडागळे (DOP Aniket Khandagale) यांनी सिनेमॅटोग्राफी, तर फैझल महाडीक (Faizal Mahadik) यांनी संकलन केलं आहे. महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे. मोझेस फर्नांडीस (Mezos Fernandis) या चित्रपटाचे फाईट मास्टर असून, गजानन सोनटक्के (Gajanan Sontakke) कला दिग्दर्शक आहेत. कोरिओग्राफी नेहा मिरजकर (Neha Mirajkar) यांनी केली असून, रोहित नागभिडे (Rohit Nagbhide) यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. समीर कदम (Sameer Kadam) यांनी मेकअप, तर सिद्धी योगेश गोहिल (Siddhi Yogesh Gohil) यांनी कॅास्च्युम्स डिझाईन केले आहेत. डीआय वॅाट स्टुडिओमध्ये आलं असून, या सिनेमाचे डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव (Shreeniwas Rao) आहेत. व्हिएफएक्स सुपरवायजिंग सतिश येले (Satish Yele) यांनी केलं असून, माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे (Vikram R. Sankpale) यांनी ऑनलाईन एडीटींग केलं आहे. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण (Vikramsen Chavhan) आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे (Mangesh Bhimraj Jondhale) आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.