पुणे, दि. 3 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सधन पालकही कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून शिक्षण हक्क कायद्यान्वये (Right to Education Act) खासगी शाळांत (private schools) प्रवेश मिळवीत असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने (District Administration) कारवाई करावी, अशी मागणी राईट टू एज्युकेशन मूव्हमेंटतर्फे (Right to Education Movement) एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी (District Officer) राजेश देशमुख (Rajesh deshmukh) यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.
खासगी शाळेत मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी पालक उत्पन्नाचे व रहिवासाचे खोटे दाखले सादर करतात. परिणामी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. संबंधित गैरप्रकारास आळा बसावा म्हणून प्रशासनाने काटेकोरपणे कारवाई करावी, अशी मागणी राईट टू एज्युकेशन मूव्हमेंटच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. त्यावर योग्य ती कारवाई होईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मूव्हमेंटचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड, उपाध्यक्ष संजय आल्हाट आणि सरचिटणीस नागेश भोसले यांनी दिली.
याबरोबरच पंतप्रधान आवास योजना प्रकल्पातील काही सदनिका महानगरपालिकेतर्फे खराडी (kharadi) व वडगाव (wadgaon) या मोक्याच्या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत. सदर प्रकल्पातील लाभार्थ्यांना नियमबाह्य ठरवून ज्यांना स्वतःची घरे आहेत, त्यांना सदनिका मंजूर झाल्या आहेत. परिणामी खरे लाभार्थी घरापासून वंचित राहू लागले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेच्या (pradhanmantri awas yojana) अंतर्गत गरजू पात्र लाभार्थ्यांना डावलून राजकीय व प्रशासकीय हितसंबंधी लोकांना घरे देण्यात येत आहेत, त्याची चौकशी करावी, अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीतर्फे (lok janashakti party) जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली.
संबंधित प्रकरणी तपास होऊन पात्र व्यक्तींना सदनिका हस्तांतरित करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. तर या निवेदनावर योग्य ती कारवाई करू अशी जिल्हाधिकाऱ्यांकडून हमी देण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष संजय आल्हाट (sanjay alhat), सरचिटणीस सचिन अहिरे (Sachin ahire) आणि ॲड. अमित दरेकर (adv. Amit darekar) यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84