पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आपल्याकडे नको इतके पुतळे, समुद्रात स्मारक! असे म्हणताना कोट्यावधी रुपये खर्च करून समुद्रात स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका असे बोल शिवप्रतिष्ठानचे (shivpratishthan) संस्थापक संभाजी भिडे गुरूजी (sambhaji bhide guruji) यांनी सुनावले. शिवाजी महाराजांचे (shivaji maharaj) स्मारक समुद्रात उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी कोरडे ओढले. भिमाशंकर ते शिवनेरी (bhimashankar to shivneri) धारातिर्थ गडकोट मोहीमेच्या सांगतेवेळी जुन्नर (junnar) येथे ते बोलत होते. 29 जानेवारी 2023 ते 1 फेब्रुवारी 2023 दरम्यान या पदयात्रा मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो धारकरी या मोहीमेत सहभागी झाले होते.
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या (shankarrao butte patil vidyalaya) मैदानावर मोहीमेची सांगता झाली. फेटे, टोप्या परिधान केलेले, राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक राज्यातून हे धारकरी मोहीमेत सहभागी झाले होते. हिंदू म्हणून जगायचं असेल तर शिवाजी-संभाजी हे मृत्यूंजय मंत्र जपावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांनी 289
लढाया तर संभाजी महाराजांनी (sambhaji maharaj) 134 लढाया लढल्या, हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले, त्यांचे स्मरण
करण्यासाठी मिरवणूका, उत्सव सोहळे करून चालणार नाही. तर
शिवाजी संभाजी हे होकायंत्र समजून. त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले
पाहीजेत, असे त्यांनी सांगितले.
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी
असलेल्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर मोहीमेची सांगता झाली. फेटे, टोप्या
परिधान केलेले, राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक राज्यातून
हे धारकरी मोहीमेत सहभागी झाले होते. हिंदू म्हणून जगायचं असेल तर शिवाजी -संभाजी हे
मृत्यूंजय मंत्र जपावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
विना वल्गना राष्ट्र जागे करा, हा
मंत्र शिवाजी महाराजांनी दिला आहे. राष्ट्रकार्यात पुढे येण्यासाठी जाहिरात नको,
की बोंबाबोंब नको, हे अंगीकारून राष्ट्र जागे
करण्याचे आव्हान धारकऱ्यांनी पेलावे, असेही संभाजी भिडे
यांनी म्हटले. धारातीर्थ गडकोट मोहीमेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या घालून या
परिक्रमेचे स्वागत करण्यात येत होते. ठिकठिकाणी महिलांनी थांबून भिडे गुरूजींच्या
दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
संभाजी भिडे संभाजी
महाराजांचे बलिदान अत्यंत क्लेशदायक होतं, हिंदुत्वासाठी
त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी यंदाच्या वर्षापासून धर्मवीर बलिदान
मास पाळण्याचे आवाहन त्यांनी धारकऱ्यांना केले. या काळात गादीवर झोपणे नाही,
चप्पल घालणे नाही, शुभकार्याला जाणे नाही. याचे
पालन करण्याचेही त्यांनी आवाहन (appeal) केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84