Type Here to Get Search Results !

संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): संत निरंकारी मिशनमार्फत (sant nirankari mission) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज (sadguru mata sudikshaji maharaj) व निरंकारी राजपिताजी (nirankari rajpitaji) यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’अंतर्गत 'स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. (pune news)

‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.

बाबा हरदेवसिंहजी (baba hardev singhji) यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान (cleanliness and tree plantation campaign) यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.

संत निरंकारी मिशनचे सचिव श्री. जोगिन्दर सुखीजा (santa nirankari mission secretory shree jogindar sukhija) यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, ही परियोजना संपूर्ण भारतदेशात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1100 हुन अधिक ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होतील आणि आवश्यकतेनुसार अनेक शाखा निर्धारित क्षेत्रामध्ये एकत्र येऊनही सामूहिक रूपात हा उपक्रम राबवतील.

‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, घोडनदी, पवना नदी, कुकडी नदी, मीना नदी, वेळू नदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा 41 ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण 5000 हून अधिक संख्येने सहभागी होणार आहेत.

समुद्र किनारे आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या प्रणालींचा समावेश

प्रामुख्याने प्राकृतिक जलसाठ्यांच्या क्षेत्रात पडलेला प्लास्टिक कचरा, अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ इत्यादींचा निपटारा करुन समुद्रकिनारे, घाट आणि नदीकिनाऱ्यांची स्वच्छता मिशनच्या स्वयंसेवकांकडून केली जाणार आहे.

या व्यतिरिक्त प्राकृतिक व कृत्रिम जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ इत्यादि जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन दूर करणे, रस्ते व आजुबाजुच्या क्षेत्रांमध्ये फिरण्यासाठी व चालण्यासाठी उपयोगात आणली जाणारी ठिकाणे सुशोभित करण्यासाठी वृक्ष व झुडपांचे रोपण करणे इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत ज्यायोगे पर्यावरण हरित व सुंदर होईल.

जनजागृती अभियान

या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी मुख्यत: ‘जल संरक्षण’ आणि उत्तम जलप्रथांच्या संदर्भात संदेश दर्शविणारी घोषवाक्ये, बॅनर्स, होर्डिंग्ज इत्यादिंचे प्रदर्शन तसेच  पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति जनजागृती निर्माण करणे, पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत जागृती, व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जल संरक्षण’विषयी जागरूकता इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयास आहे. वर्तमान काळात आपण अशा प्रकारच्या लोक कल्याणकारी परियोजना राबवून आपल्या या सुंदर धरतीला नुकसानीपासून वाचवू शकतो तसेच प्राकृतिक संसाधनांच्या अनावश्यक वापरावरही अंकूश लावू शकतो.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.