Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्हा परिषदेचे (Pune Zilha Parishad) आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल (Health and Construction Committee Former Chairman Mangaldas Bandal) हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील 22 महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. (shivajirao bhosale bank latest news)
त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर काल 17 फेब्रुवारी 2023 रोजी मंगलदास बांदल हे कारागृहाबाहेर आले. यामुळे पुणे जिल्ह्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष केला आहे. सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण करून बांदल यांची सुटका झाल्याची माहिती ॲड. आदित्य सासवडे (Adv. Aditya Saswade) यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या विरुद्ध एप्रिल 2021 मध्ये शिक्रापूर (Shikrapur) येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे (Dattatraya Mandhare, former president of the society) यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्यांना तातडीने अटक करण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढत गेल्याने त्यांच्या अडचणी आणि कोठडीत वाढ झाली. (shivajirao bhosale bank latest news)
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या आरोपावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना देखील अटक झाली होती. तर बांदल यांच्या विरूध्द एकुण 5 गुन्हे दाखल होते. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्यात बांदल यांचेसह सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन केला होता.
राज्यात घडलेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर पैलवान मंगलदास बांदल हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगलदास बांदल यांच्या सुटकेनंतर त्यांच्या पुणे जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84