Type Here to Get Search Results !

श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठात 'रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस प्रतिमानांचे संशोधनातील उपयोजन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) (SNDT) भूगोल विभागाने (Geography Section) 20 फेब्रुवारी 2023 ते 1 मार्च 2023 दरम्यान ‘रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस प्रतिमानांचे संशोधनातील उपयोजन’ (Research applications of remote sensing and GIS paradigms) या विषयावर कार्यशाळेचे (workshop) आयोजन केले आहे.

या कार्यशाळेस देशभरातील 25 विद्यार्थी-विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. भूगोल विभाग प्रमुख व कार्यशाळेचे आयोजक प्रा. विरेंद्र नगराळे (Head of Department of Geography and organizer of the workshop Prof. Virendra Nagarle) यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे सांगत व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण याबाबत रुपरेषा मांडली.

कार्यशाळेचे उद्‍घाटन (Inauguration) सोमवारी (दि. 20 फेब्रुवारी 2023) विद्यापीठाच्या कुलगुरू. प्रा. उज्वला चक्रदेव (Vice-Chancellor of the University. Prof. Ujwala Chakradev) यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अरुण सराफ (Not Prof. Arun Saraf) उपस्थित होते. प्रा. अरुण सराफ यांनी भूगोल संशोधनातील अत्याधुनिक तंत्रज्ञान रिमोट सेन्सिंग, जीआयएस यांचे महत्त्व आणि सद्यस्थितीत व भविष्यकाळातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (Artificial Intelligence) अत्यावश्यकता स्पष्ट केली.

प्रा. शितल मोरे (Prof. Shital More) यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रगतीचा अहवाल सादर केला. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पूनम महेता (Poonam Mehta) देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रत्नप्रभा जाधव (prof. Ratnaprabha Jadhav) यांनी केले, तर प्रा. सचिन देवरे (prof. Sachin Devare) यांनी आभार मानले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.