Type Here to Get Search Results !

उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या ग्रामस्थांना शासकीय कागदी घोडेबाजाराचा मोठा फटका

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महसूल व वनविभागाच्या (revenues and forest department) समन्वयाअभावी डाळजकरांना फौजदारी गुन्हे (criminal charges) अंगावर घेण्याची वेळ आली आहे. उजनी धरणामुळे (ujani dam) विस्थापित झालेल्या ग्रामस्थांना शासकीय कागदी घोडेबाजाराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करून नकाशातून निर्वनिकरण क्षेत्र वगळण्याबाबतची मागणी (Demand for exclusion of deforested areas) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे (Forest Range Officers) केली असता, त्यांनी आम्हाला भोपाळचा (Bhopal) रस्ता दाखविल्याचे डाळज (dalaj) क्र. 2 गावचे माजी सरपंच अॅड. प्रदीप जगताप (adv Pradeep jagtap) यांनी स्पष्ट केले. केवळ वाटप केलेले क्षेत्र वनविभागाच्या उताऱ्यावरून कमी करण्याचे कष्ट न घेतल्यामुळे सध्या ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले,”उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या डाळज गावाचे पुनर्वसन (Rehabilitation) करताना पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांनी काही खासगी गट संपादित करत वाटप केले. याबरोबर मूळचा वनविभागाचा गट असलेला परंतु, एका खासगी कंपनीसाठी 10 एकर 10 गुंठे जागा 1980 च्या दरम्यान संपादित न करता वाटप केली आहे. या भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून संबंधित लाभार्थ्याला देण्यात आले. सदर कार्यवाही पुनर्वसन जिल्हाधिकारी व भूमिअभिलेखच्या आधिपत्याखाली राबविण्यात आली. मात्र संबंधितांनी नकाशामध्ये वनविभागाचे संपादित केलेले व हे निर्वनिकरण झालेले क्षेत्र कमी केले नाही. यामुळे जीपीएस प्रणाली वापरून वनविभागाने मूळ नकाशावरून केलेल्या मोजणीमध्ये ग्रामस्थांचे अतिक्रमण दाखविले जात आहे.”

पुढे ते म्हणाले,“ही बाब धरणग्रस्तांच्या अडचणीत वाढ करणारी व नाहक त्रास देणारी आहे. सदर बाब गंभीर असल्याने ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही इंदापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सदर विषय मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र त्यांनी हा विषय वरिष्ठ पातळीचा असल्याचे सांगत आम्हाला भोपाळला जाण्याचा सल्ला दिला. वनविभागाने गावातील भोळ्या-भाबड्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारात महसूल व वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नकाशा दुरुस्ती व वाटप क्षेत्राचे संपादन करण्याबरोबर धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

दरम्यान, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी (Taluka Forest Range Officer Ajit Suryavanshi) यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.

नायब तहसीलदार अनिल ठोंबरे (Deputy Tehsildar Anil Thombre) म्हणाले कि,”डाळज येथील ग्रामस्थांचा अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. यानुसार संबंधित मंडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती वस्तूस्थिती समोर येईल.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.