दिव्यांग बांधवाना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावेत याकरीता खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. 30 जानेवारी 2023) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर लागलीच आज त्यांनी दिल्ली येथे सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघात (Baramati Lok Sabha Constituency) वयोश्री योजनेचे तब्बल एक लाख दहा हजार, तर ADIP योजनेचे दहा हजार इतके लाभार्थी आहेत. त्यांच्या तपासण्या पूर्ण झाल्या असून सहाय्यभूत साधने वाटप करायची आहेत. त्यासाठी साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून वितरित करावे, अशी मागणी सुळे या केंद्र सरकारकडे सातत्याने करत आहेत. त्यासाठी त्यांना आंदोलनही करावे लागले.
आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. 31 जानेवारी 2023) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या. आज या अधिवेशनासाठी आलेल्या सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन सुळे यांनी त्यांना वयोश्री आणि ADIP योजनांबाबत पुन्हा एकदा मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अश्वासन त्यांनी दिल्याचे सुळे यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84