Type Here to Get Search Results !

वीज नियामक आयोगाच्या सुनवाईला आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्षांची गैरहजेरी

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महावितरणने (Electricity Board) प्रस्तावित केलेल्या अवाजवी वीजदरवाढी संदर्भात आज वीज नियामक आयोगाच्या वतीने पुण्यात सीओईपी (COEP) येथे जनसुनवाईचे आयोजन केले होते. या जनसुनवाईमध्ये कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), पुणे (Pune) जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय पक्षांपैकी केवळ आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) आजच्या सुनवाईमध्ये सहभाग घेऊन प्रस्तावित वीजदर वाढीला आपला विरोध दर्शवला, तसेच लेखी आक्षेप नोंदवत आयोगासमोर जनतेची बाजू ठामपणे मांडली. दुर्दैवानं इतर राजकीय पक्षांनी मात्र वीज दरवाढीच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दुर्लक्ष करत या जनसुनवाईमध्ये सहभाग घेणे टाळले. वीज नियामक आयोगाच्या मंचावर संधी असून देखील इतर राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे टाळले असल्याने त्यांना नंतर वीज दरवाढी विरोधात गळे काढण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नाही.

आम आदमी पार्टीने दिल्ली व पंजाबमध्ये वीजदरांचा मुद्दा हा प्रमुख राजकीय मुद्दा बनवलेला असून वीज दरवाढीबद्दल आम आदमी पार्टी ही अधिक संवेदनशील आहे. दिल्ली व पंजाब मधील जनतेला अनुक्रमे 200 व 300 युनिट प्रतिमाह मोफत देण्याचं काम आम आदमी पार्टीची सरकारे प्रामाणिकपणे करत आहेत.

आम आदमी पार्टीच्या वतीने राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (State Organizer and Pune City Working President Vijay Kumbhar) यांनी लेखी आक्षेप नोंदवले तर आम आदमी पार्टीचे श्रीकांत आचार्य (Shrikant Acharya of Aam Aadmi Party) यांनी आज वीज नियामक आयोगासमोर पक्षाची बाजू मांडली. यावेळी आम आदमी पक्षाचे किशोर मुजुमदार (Kishore Mujumdar), अमोल काळे (Amol Kale), अमोल मोरे (Amol More), आम आदमी शेतकरी संघटनेचे मनीष मोडक (Manish Modak) हे उपस्थित होते. महावितरणने दाखवलेले डिस्ट्रीब्यूशन लॉसेसचे आकडे हे दिशाभूल करणारे आहेत, असे आचार्य यांनी प्रतिपादन केले. महाजेनकोकडून स्वस्त दरातील वीज उपलब्ध असताना देखील तब्बल 58% वीज ही महागड्या दराने खाजगी वीज उत्पादकांकडून खरेदी केली जात आहे आणि त्यामुळे महावितरणवर आर्थिक भार वाढत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरणच्या वीज खरेदीचे फॉरेनसिक ऑडिट (Forensic Audit) करावे तसेच महावितरणचे कॅग संस्थेमार्फत फायनान्शियल ऑडिट (Financial Audit) करावे आणि हा अहवाल येईपर्यंत वीजदर वाढीला मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने केली.

वीज ही सामान्य जनतेसाठी, व्यापाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाची मूलभूत गरज आहे असं आम आदमी पार्टीचे मत असून प्रस्तावित वीजदर वाढीमुळे सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातील छोटे कारखाने, फाउंड्री, हातमाग, यंत्रमाग हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील अनेक उद्योग हे राज्याबाहेर चाललेले आहेत. शेजारच्या कर्नाटकात स्वस्त वीज मिळत असताना महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये उद्योजकांना महागड्या वीज बिलांचा मोठा फटका बसत आहे. राज्यातून उद्योगांचे होत असलेले स्थलांतरण व त्यामुळे वाढलेली बेरोजगारी यामागे वाढीव वीजदर हा सुद्धा मोठा घटक असल्याची आम आदमी पक्षाची भूमिका आहे. सामान्य नागरिक देखील विजेची प्रचंड महागडी बिले भरून हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला या वीज दरवाढीतून दिलासा देणे आवश्यक आहे.

महावितरणचे होऊ घातलेलं सोयीचं खाजगीकरण म्हणजे नफ्यातील शहरे हे खाजगी संस्थेला व तोट्यातील भाग महावितरणकडे अशी त्याची रचना असल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर महावितरणला आणि पर्यायाने सामान्य नागरिकांना बसणार आहे. सदर खाजगीकरणाला आम आदमी पक्षाचा विरोध आहे. वीज नियामक आयोगाने देखील याला मान्यता देऊ नये, अशी विनंती आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.