पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सेनगाव (sengaon)
तालुक्यात सवना शिवारात शेतात अर्धा किलो सोने (gold) असल्याचे सांगून एक लाख रुपये घेऊन शेतातील खड्ड्यातून पितळी शिक्के (Brass
Stamps) काढून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोरेगाव
पोलीस ठाण्यात (Goregaon police station) शुक्रवारी (दि. 3
फेब्रुवारी 2023) पहाटे गुन्हा दाखल झाला असून,
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील अमोल कैलास साळवे (amol
kailas salve) यांचे सवना शिवारात शेत आहे. त्यांच्या शेताच्या
बाजूलाच टनका (जि. वाशीम) (washim) येथील संतोष उद्धव गवळी
(Santosh udhhav gawali) यांचे शेत आहे. शेतातील कामाच्या
निमित्ताने त्यांचे नेहमीच बोलणे होत होते. काही दिवसांपूर्वी संतोष याने अमोल
साळवे यांना तुमच्या शेतात सोने असल्याचे सांगितले. सोने काढून देण्यासाठी 1 लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले.
शेतात एका विशिष्ट ठिकाणी खड्डा खोदल्यानंतर तेथे असलेल्या पितळी तांब्यात सोने
असल्याचेही सांगितले.
त्यानंतर अमोल साळवे यांनी संतोष व त्यांच्या सोबत असलेल्या
व्यक्तींना 1 लाख
रुपये दिले. ठरल्याप्रमाणे संतोष गवळी याच्यासह रफीक पठाण, माधव
कांबळे (रा. तोंडगाव, जि वाशीम) (tondgaon) व अन्य चार ते पाच जण बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शेतात आले. यावेळी
माधव याने मला सोने दिसले असून, खड्डा खोदण्यास सांगितले.
त्यानुसार रात्री खड्डा खोदकाम करून त्यांनी एका पितळी तांब्यातून काही शिक्के
काढून दिले. सदर शिक्के सोन्याचे आहेत असे सांगून ते अमोल यांच्या जवळ दिले व 1
लाख रुपये घेऊन तेथून काढता पाय घेतला.
रात्रीच्या वेळी अमोल याने पितळी तांब्या घेऊन घर गाठले. त्यानंतर
त्यातील शिक्यांची पाहणी केली असता, ते पितळी शिक्के असल्याचे स्पष्ट झाले. यावरून फसवणूक
झाल्याचे लक्षात येताच त्याने टनका (tanka) येथे जाऊन संतोष
याचा शोध सुरु केला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही.
त्यानंतर त्याने शुक्रवारी पहाटे गोरेगाव पोलीस ठाणे गाठून
तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संतोष गवळी, रफीक पठाण, माधव कांबळे व
इतर पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव,
जमादार कुंदर्गे, अनिल भारती यांच्या पथकाने
तातडीने दोन जणांना अटक केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84