Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील लोणी (loni) गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत (Grand Father) रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. (ate leftover idli sambar) त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली. परंतु उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा सोमवारी (दि. 6 मार्च 2023) दुपारी मृत्यू झाला.
मयत विद्यार्थीनीचे नाव तेजस्विनी मनोज दिघे (Tejaswini Manoj Dighe) आहे. ती शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगत होती. दरम्यान तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपुरेच राहिल्याने घरातील सर्वच हळहळ व्यक्त करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने तिचे आजोबा यातून बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी येथील तेजस्वनी दिघे बाभळेश्वर (Babhleshwar) येथील कनिष्ठ महाविद्यालयात (Junior College) शिक्षण घेत होती. तिची बारावीची परीक्षा सुरू होती. प्रवरानगर (Pravaranagar) येथील केंद्रावर तिचा नंबर आला होता. विज्ञान शाखेचे काही पेपर तिने दिले होते. गेल्या बुधवारी रसायनशास्त्राचा (chemistry) पेपर होता. त्या दिवशी सकाळी तिने आणि तिचे आजोबा भीमराज दिघे (bhimraj dighe) यांनी रात्रीचे इडली-सांबर खाल्ले. तिचे आजोबा भीमराज दिघे हे रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत.
रात्रीचे शिळे अन्न खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. काही वेळातच दोघांनाही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात (Pravara Medical Trust Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, पोट दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. मात्र, नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना प्रथम संगमनेरला आणि त्यानंतर पुण्यातील केईएम हॉस्पिटलला (KEM Hospital) हलविण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू होते.
एका बाजूला मृत्यूशी लढाई सुरू होती तर दुसरीकडे बारावीचे उरलेले पेपर बुडत होते. अखेर तेजस्विनी जगण्याची लढाईही हरली. सोमवारी तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तिचे आजोबा मात्र बचावले आहेत.
तेजस्विनी विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी तिने अभ्यासही केला होता. पहिले काही पेपर दिल्यानंतर तिच्यावर हे दुर्दैव ओढावले. त्यात तिचा मृत्यू झाला. तिचे आणि कुटुंबयांचेही स्वप्न भंगले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84