Type Here to Get Search Results !

महिलांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा गौरव : वि.दा. पिंगळे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सरस्वती एज्युकेशन फाउंडेशन (Saraswati Education Foundation) या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तुत्व केलेल्या सहा महिलांना सरस्वती महिला रत्न पुरस्कार (Saraswati Mahila Ratna Puraskar) देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे हे रोप्य महोत्सवी वर्ष आहे या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात ज्या महिलांनी उत्तुंग असे काम केले अशा सहा महिलांना हा पुरस्कार मसापालचे कार्यवाह, प्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे (V. D. Pingle) यांच्या हस्ते देण्यात आले. (pune news)

वि. दा. पिंगळे आपल्या भाषणात असे म्हणाले,”भारतीय संस्कृती टिकविण्यात महिलांचे योगदान मोठे आहे. ज्या समाजामध्ये महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान होतो तो समाज सुसंस्कृत समाज म्हणून ओळखला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे स्थान खूप श्रेष्ठत्वाचे आहे. एक काळ असा होता ज्या काळात महिलांचे कर्तुत्व आणि आयुष्य घराच्या उंबरठ्या आत दाबून टाकलेले होते. पण शिक्षणाचे अस्र महिलांच्या हातात मिळाले आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले. स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आणि जगाला दाखवून दिले की स्त्रियांच्या सोबतीशिवाय, त्यांच्या योगदानाशिवाय इथला समाज, संस्कृती आणि देश टिकणार नाही.”

सुप्रसिद्ध कलावंत आणि कवयित्री भाग्यश्री देसाई (Famous artist and poet Bhagyashree Desai), निवेदन क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणाऱ्या शोभा कुलकर्णी (Shibha Kulkarni), सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अश्विनी जाधव (Ashwini Jadhav who works in social and educational fields), शब्दाई पत्रिका दिवाळी अंकाच्या संपादिका आणि प्रकाशिका स्वाती पिंगळे (Editor and Publisher of Shabdai Patrika Diwali Issue Swati Pingle), संगीत क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या वृषाली महाजन (Vrishali Mahajan in the field of music) आणि आध्यात्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रजनी नकाते (Rajani Nakate from Spiritual field), यासोबत काही आदर्श शिक्षकांचा देखील सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. (pune news)

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे चेअरमन अंशुल शर्मा (Anshul Sharma, Chairman of Shastri Group of Institutes), सुप्रसिद्ध कलावंत, कवयित्री आणि उद्योजिका भाग्यश्री देसाई, उद्योजक संजय बराटे (Entrepreneur Sanjay Barate), दिलीप चौधरी (Dilip Chaudhary), शिक्षणतज्ञ अशोक नकाते (Educationist Ashok Nakate), भूपेंद्रसिंग चौधरी, मॅनेजिंग डायरेक्टर ट्रायल फॅक्टरियल कन्सल्टन्सी (Bhupendrasingh Chaudhary, MD, Trial factorial consultancy) पुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन संस्थेचे अध्यक्ष की ज्यांनी 25 वर्ष विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या भूमिकेतून काम करणारे सुनील देसले (Suni Desale) व सुरेखा देसले (Surekha Desale) यांनी केले होते. पुरस्कार कार्यक्रमानंतर संस्थेचे इरा. किड्स शिवणे या नर्सरी स्कूलचे गॅदरिंग ही संपन्न झाले, अनेक मान्यवरांचा आणि पालकांचा उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आणि शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. प्रा. सुनील देसले यांनी प्रास्ताविक केले तर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सुरेखा देसले यांनी केले. (pune news)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.