Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 26 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाचे (Cricket Crime) प्रतिउत्तर देण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या टोळक्याने, ज्याला मारायला गेले, तो मिळून आला नाही म्हणून त्याच्या आई आणि तीन बहिणींना लोखंडी हत्यारांनी जीवघेणी मारहाण (Beating by Weapons) केल्याची घटना वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) हद्दीतील शिवणे (Shivane) भागातील दांगट पाटील नगर (Dangat Patil Nagar) भागातून समोर आली आहे. हा हल्ला करून पळून गेलेल्या तिघांना जेरबंद (Arrested) करण्यात वारजे पोलिसांना यश आले असून, एकजण फरार झाला आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, शनिवार दि. 25 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास, एनडीए
रस्त्यावरील मैदानात (NDA Ground) क्रिकेट खेळताना काही उत्तर भारतीय
(UP) तरुणांमध्ये बाचाबाची शिवीगाळ झाली. यामध्ये एकमेकांचे
नातेवाईक असलेल्या कृष्णा सहानी (वय. 23 वर्ष, रा. दांगट पाटील नगर, शिवणे, पुणे)
(Krishna Sahani) आणि रामनाथ सहानी (वय. 32 वर्ष, रा. दांगट पाटील
नगर, शिवणे, पुणे) (Ramnath Sahani) यांच्यामध्ये मारामारी
(Fight) झाली होती.
या मारामारी नंतर रामनाथ
घटनास्थळावरून निघून गेला होता. मात्र त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास रामनाथ
सहानी याने त्याचा भाऊ रामप्रवेश सहानी (वय. 26 वर्ष, रा. दांगट पाटील नगर, शिवणे,
पुणे) (Rampravesh Sahani), सुधीर सहानी (वय. 22 वर्ष, रा.
दांगट पाटील नगर, शिवणे, पुणे) (Sudhir Sahani) आणि आणखीन एक
साथीदाराला सोबत घेऊन, कृष्णा सहानीला सायंकाळी झालेल्या मारहाणीचे प्रतीउत्तर
देण्यासाठी (Reply of Fight) त्याच्या घरी गेले. दरम्यान रामनाथ
त्याच्या साथीदारांना घेऊन कृष्णाच्या घरी गेला असल्याची माहिती कृष्णाला मिळाली.
यावेळी त्याने घरच्यांना तत्काळ फोन करून सांगत, दरवाजा न उघडण्याबाबत सांगितले होते.
मात्र चिडलेल्या रामनाथ याने त्याच्या
साथीदारांसह लोखंडी शस्त्राने दरवाजावर हल्ला करून, दरवाजा तोडून घरात प्रवेश
केला. यावेळी घरात कृष्णा मिळून न आल्याने, रामनाथ आणि त्याच्या साथीदारांनी कृष्णा’ची
आई आणि तीन अल्पवयीन बहिणींना हातात आणलेल्या लोखंडी हत्यारांनी जीवघेणी मारहाण करून,
घटनास्थळावरून पोबारा केला. यावेळी शेजाऱ्यांनी जखमी चौघांना देखील तत्काळ
उपचारार्थ रुग्णालयात हलवल्याने, अनुचित प्रकार टळला आहे.
याबाबत माहिती मिळताच वारजे पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior
PI Dagadu Hake), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे
(Crime PI Dattaram Bagwe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक अरविंद काळे (PSI Arvind Kale), पोलीस शिपाई अमोल
सुतकर (PC Amol Sutkar), रमेश चौधरी (PC Ramesh Choudhari) यांच्यासह वारजे पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तत्काळ संशयितांचा शोध घेत, पसार झालेल्या चौघांपैकी रामनाथ
सहानी, रामप्रवेश सहानी आणि सुधीर सहानी या तिघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
तर त्यांचा एक साथीदार मात्र फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत
वारजे पोलीस स्टेशन मध्ये खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt to Murder)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर भारतीय तरुणांच्या
टोळक्यात यापूर्वी काही महिन्यांअगोदर देखील बुधवार दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी,
त्याच एनडीए’च्या मैदानात क्रिकेट खेळण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला
होता. यामध्ये त्या टोळक्याने एका तरुणाचा गणपती माथा (Ganapati
Matha) येथील गणपती मंदिरापर्यंत पाठलाग करून, त्याला लोखंडी
शस्त्रांनी वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा
अशाचप्रकारे क्रिकेटवरून जीवघेणा हल्ला (Attack on Cricket)
झाल्याची घटना झाल्याने, शरीर सुदृढ करण्यासाठी खेळला जाणारा हा खेळ जीवघेणा का
केला जातोय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84