Type Here to Get Search Results !

E waste Pune: कोंढवे धावडे मध्ये पर्यावरणपूरक इ-वेस्ट आणि प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र सुरु

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 पुणे, दि. 6 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): ज्यांच्या नावाने शासनाने स्वच्छता अभियान सुरु केले होते, त्याचं संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त (Sant Gadge Baba Jayanti) पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि स्थानिक सामाजिक संस्थांद्वारे पहल (PEHEL) संस्थेच्या वतीने कोंढवे धावडे येथील जिल्हा परिषद शाळेत (ZP School Kondhave Dhawade) माजी सरपंच नितीन धावडे (Nitin Dhawade), माजी उपसरपंच अविनाश सरोदे (Avinash Sarode), शिवसेना विधानसभा प्रमुख नितीन वाघ (Nitin Wagh), जिल्हा समाज कल्याण दक्षता व नियंत्रण समिती सदस्य संतोष शेलार (Santosh Shelar), विकास कांबळे (Vikas Kambale) यांच्या उपस्थितीत इ-वेस्ट आणि प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्र (E-waste and plastic waste collection centre) सुरु करण्यात आले.

कोंढवे धावडे शाळेतील शिक्षिका पल्लवी शिरोडे – शेंदुर्णीकर (Pallavi Shirode - Shendurnikar) आणि राहुल शेंदुर्णीकर (Rahul Shendurnikar) यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून, शाळेतील मुलांना प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. प्लास्टिकचे विघटन वर्षानुवर्ष होत नाही. यामुळे प्लास्टिक कचरा वेगळा करणे व रिसायकल करणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्यामुळे भविष्यात ही पिढी प्लास्टिकचा कमीतकमी वापर करेल. प्लास्टिक रिसायकल करेल.

यावेळी शाळेतील मुलांनी आपल्या घरी असलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून केंद्रात जमा केला आणि गावातील नागरिकांना देखील प्लास्ती कचरा जमा करण्यास सांगितले. संकलित केलेल्या ई-कचऱ्याचे व प्लॅस्टिकचे सुयोग्य व्यवस्थापन करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. संकलित केलेल्या ई कचऱ्यापैकी दुरुस्त होऊ शकतील अशा वस्तू गरजूंना पुनर्वापरासाठी देणे, ई कचरा आणि प्लास्टिक अधिकृत रिसायकल पर्यंत पोहोचवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ठय असल्याचे शेंदुर्णीकर यांनी यावेळी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.