Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times,
marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune
latest news
पुणे, दि. 25 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील एका बिअर
शॉपी (Beer Shopee) मध्ये घुसून,
दमदाटी करत, दोन बिअरचे बॉक्स (Beer Box) हिसकावून नेणाऱ्या
चौघांना अटक करण्यात आल्यानंतर आता वारजे पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का नुसार (Macoca
Act) कारवाई केली आहे. (Warje Malwadi Police Station) याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने वारजे पोलिसात फिर्याद दिली होती.
याबाबत वारजे पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी मधील डुक्कर खिंडीजवळ (Dukkar
Khind), करण प्लाझा (Karan Plaza) मध्ये असलेल्या रसराज बिअर अँड वाईन शॉपी (Rasraj Beer & Wine
Shopee) मध्ये सोमवार दि. 13 मार्च 2023 रात्री पावणे दहाच्या
सुमारास दुचाकी वरून आलेल्या टोळक्याने दोन बॉक्स बिअर घेतली. यावेळी फिर्यादींनी
बिअरचे पैसे मागितले असता, “तू कोणाला पैसे मागतोस. तुला
दुकान चालवायचे आहे का. आम्ही इथले भाई आहोत. जा कुठे तक्रार करायची तिकडे तक्रार
कर” अशी धमकी देत, फिर्यादींच्या
हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत, हप्ता देण्यासाठी
धमकी देत, बिअरचे बॉक्स (Beer Box)
हिसकावून घेऊन निघून गेले होते.
याबाबत वारजे पोलीस
स्टेशन मध्ये तक्रार प्राप्त होताच, वारजे
पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Sr. PI Dagadu Hake) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API
Bapu Raikar) यांच्या पथकाने तपास पथकाच्या मदतीने तपासाची
सूत्र हलवत 24 तासांच्या आत, लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा
शेडगे (वय 23 वर्षे), स्वामी ऊर्फ काळू ज्ञानेश्वर खवळे (वय
22 वर्षे, दोघेही रा. बिल्डींग, म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी, पुणे), अनिल बापू बनसोडे (वय 30 वर्षे), आदित्य गणेश मंडलीक (वय 20 वर्षे, दोघेही रा.
डी बिल्डींग, म्हाडा वसाहत, वारजे
माळवाडी, पुणे) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे दाखल
गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा
केल्याचे कबूल केल्यानंतर, चौघांना अटक करण्यात आली होती.
ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण रेकॉर्ड वरील गुन्हेगार (Offenders
on record) असून, आरोपी भैय्या शेंडगे हा टोळीप्रमुख असून
त्याने काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन संघटीत टोळी (organized
gang) तयार केली. त्यांच्या टोळीने खुनाचा प्रयत्न (Attempt
to Murder), जबरी चोरी (Robbery), दुखापत करणे
आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Crimes of serious nature) केलेले
आहेत. आरोपींनी संघटित दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गुन्हे केल्याचे
निदर्शनास आल्यानंतर त्यांना समज दिल्यानंतर देखील त्यांच्या सुधारणा झाली नाही.
यानंतर वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दगडू हाके (Sr PI D.S. Hake), गुन्हे शाखेचे पोलिस
निरीक्षक दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe) यांनी सहाय्यक आयुक्त
रूक्मिणी गलंडे (ACP Rukmini Galande) आणि पोलिस उपायुक्त सुहेल
शर्मा (IPS Suhail Sharma) यांच्या मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त
राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे आरोपींविरूध्द
मोक्का कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला
असून, आता या गुन्ह्यात मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84