Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 25 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje
Malwadi Police Station) हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील
(Dr. Babasaheb Ambedkar Chowk) मटण शॉप (Mutton Shop) आणि पान टपरी (Pan Shop) चालकांना लोखंडी हत्याराचा
(Weapon) धाक दाखवून लुटमार (Robbery)
करणाऱ्या एका तडीपार आरोपी’सह (Deported Criminal) तिघांना
पकडण्यात (Arrest) वारजे पोलिसांना यश आले आहे. याबाबत
इम्तियाज कुरेशी (वय. 33 रा. पारगे नगर, कोंढवा, पुणे) (Imtiaz Qureshi) यांनी वारजे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
वारजे पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, फिर्यादी
कुरेशी यांचे वारजे जुन्या जकात नाक्यावरील (Old Jakat Naka Warje) डॉ बाबासाहेब आंबेडकर
चौक येथे जनता मटण चिकन नावाचे दुकान (Janta Mutton Chicken Shop) असुन, ते त्यांनी भाडयाने घेतले आहे. कुरेशी हे त्यांचे दुकान त्यांचे
मदतीस असणारा कामगार जुनेद कुरेशी (Junaid Qureshi) याचेसह चालवितात. फिर्यादी
हे बुधवार दि. 15 मार्च 2023 रोजी त्यांचे दुकानात हजर असताना, रात्री सव्वा आठ ते साडे आठच्या दरम्यान तडीपार गुन्हेगार आणि त्याचे इतर दोन
साथीदारांनी फिर्यादीचे दुकानात येवुन फिर्यादी हे दुकानाचे भाडे असलेले पैसे देणे
लागत नसताना, त्यांनी पैसे दिले नाही या कारणावरून फिर्यादी व कामगार जुनेद
कुरेशी यास लोखंडी शस्त्राचा धाक दाखवुन त्यांना शिवीगाळ करुन व जीवे मारण्याची धमकी
दिली.
यावेळी ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मटण दुकानातील
6 हजार 300 रुपये जबरजस्तीने काढून घेवून फिर्यादी यांचे दुकानाचे
जवळच असलेल्या सिध्देश्वर पान शॉपचे (Siddheshwar Paan Shop) मालक यांनाही लोखंडी
शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांचे पान शॉप मधील 3 हजार रूपये
असे एकुण 9 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन, त्यांना जीवे
मारण्याची धमकी देवुन, फिर्यादी यांचे दुकानातील लोखंडी सत्तुर घेवुन जावुन फिर्यादी
यांचे दुकानातील अंडयाचे व मोटार सायकलचे 1 हजार
रुपयांचे नुकसान
केले होते.
यानंतर वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagadu Hake), गुन्हे शाखेचे
पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe) यांच्या
मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API
Bapu Raikar), पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे (PSI Narendra
Mundhe), विजय भुरूक, अमोल राऊत, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, विक्रम
खिलारी यांचे पथक संशयित आरोपींच्या मागावर होते.
दरम्यान वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस
शिपाई विजय भुरूक यांना विश्वसनीय खबऱ्याकडून जनता मटण शॉप जबरी चोरी प्रकरणातील
हवा असलेला तडीपार आरोपी शुभम अमर रास्ते (वय. 24 वर्ष, रा. वारजे, पुणे) (Shubham Amar
Raste) हा काकडे सिटी (Kakade City) येथील
पाण्याच्या तळ्याशेजारी आलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भुरूक यांनी
तत्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली असता, शुभम रास्ते पोलिसांना पाहून
पळून जाऊ लागला. यावेळी भुरूक यांनी त्याचा पाठलाग करून कर्वेनगर मधील इस्माईल बेकरीच्या
(Ismail Bakery) शेजारील ओढ्यात उडी मारून पळून जाण्याच्या
प्रयत्नात असलेल्या शुभम रास्ते याला शिताफीने पकडले.
दरम्यान शुभम रास्ते याला वारजे पोलीस
स्टेशनला आणून, त्याला विश्वासात घेऊन, त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने
गुन्हा कबूल करत, त्याच्या साथीदारांची नावे सांगितल्यावरून, लखन मुन्ना बिरे (वय.
29) आणि अजय अरविंद यादव (वय. 27 दोघेही रा. वारजे माळवाडी, पुणे) यांना ताब्यात
घेतले असून, तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. वारजे पोलीस पुढील तपास करत
आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84