Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 23 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Pune Metropolitan Region Development Authority - PMRDA) 12 ॲमिनेटी स्पेसचा लिलाव करण्याच्या घेतलेल्या निर्णयास आम आदमी पक्षाने (AAP) विरोध केला आहे. हा नफेखोरीचा प्रकार असून तो त्वरीत मागे घ्यावा, अशीही मागणी (demand) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत ‘आप’चे मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) म्हणाले कि,”या जागा सार्वजनिक सुविधा निर्मितीसाठी नगर नियोजनाचा एक अत्यावश्यक भाग म्हणून ताब्यात घेतलेल्या असतात. त्या बदल्यात विकसकास वाढीव ‘एफएसआय’ अथवा ‘टीडीआर’ दिलेला असतो. त्यामुळे अप्रत्यक्ष मोबदला देऊन या जागा स्थानिक प्रशासनास मिळाल्या आहेत. त्या जागावर उद्याने, क्रीडा संकुले, आरोग्य केंद्रे, पार्किंग, शाळा, पोलीस ठाणे, पाणी पुरवठा केंद्र, अग्निशमन केंद्र आदी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या असतात.”
पुढे ते म्हणाले,”प्रशासन या सुविधा मालमत्ता कर व इतर स्थानिक कराच्या बदल्यात उपलब्ध करून देते. त्या मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध करून देणे, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. असे असताना या सुविधा खासगी विकासकाला देणे म्हणजे थेट या सुविधा नफेखोरीसाठी उपलब्ध करून देणे आहे. यामुळे या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या शाळा, दवाखाने ठराविक उच्च गटातील नागरिकांना उपलब्ध होतील. आरोग्य, शिक्षण या मूलभूत हक्काच्या सुविधांपासून सामान्य मध्यमवर्गीय नागरिक वंचित राहतील.”
हेही वाचा - वृक्षतोड करण्यासाठी परवानगी मागण्याची ही तर वेगळीच पद्धत
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes