Type Here to Get Search Results !

AAP: महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करा; वीज दरवाढी विरोधात आपचे पुण्यात आंदोलन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

aap strike on electricity rates hike proposal - checkmate times

पुणे, दि. 27 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि. 1 एप्रिल 2020 पासून 20% वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता महावितरणकडून तब्बल 37% वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आज आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) पुण्यात रास्ता पेठ (Rasta Peth) येथे महावितरण कार्यालयासमोर आप महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (AAP Maharashtra State Organizer and Pune City Working President Vijay Kumhar) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे (AAP State President Ranga Rachure) यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आंदोलन करण्यात आले.

काही आठवड्यांपूर्वी पुण्यात महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाच्या जनसुनवाईला केवळ आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्ष गैरहजर होते. यावेळी आम आदमी पार्टी तर्फे श्रीकांत आचार्य यांनी आयोगासमोर दर वाढीला सकारण विरोध नोंदवला होता. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की, आमचे सरकार आल्यास आम्ही 300 युनिट घरगुती वापरात 30% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात 100 ते 200 युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत.

दुसरीकडे दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून 200 युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. 1 जुलै पासून 300 युनिट घरगुती आणि शेतकऱ्यांना मोफत वीज केली आहे. या वेळेस बोलताना ‘जे दिल्ली, पंजाब या राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही?’ असा सवाल आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी केला.

आपल्या राज्यात 2.50 ते 3.00 रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज 12 ते 18 रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आता भाजप – शिवसेना सरकार आले आहे. त्यामुळे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी या युती सरकारवर आहे. त्यामुळे राज्यात दि 1 जुलै 2022 पासून विजेच्या दरात जी 10 ते 20% अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. मुख्यमंत्री शिंदे हे खरे शिवसैनिक असल्यामुळे 30% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी अशी टीका आपचे मुकुंद किर्दत (mukund kirdat) यांनी केली आहे.

वीज कंपन्यांमध्ये (महाजेन्को, महापारेषण, महावितरण) (managenco, mahapareshan, mahavitaran) मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्यामुळे विजेचे दर जास्ती आहेत, वीज दर कमी राहण्यासाठी वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे, कच्चा माल म्हणजे आयात कोळसा खरेदीमधील कृत्रिम भाववाढ, देशांतर्गत कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, संशयास्पद कोळसा धुणे प्रक्रिया आदि बाबींमुळे निर्मिती खर्च फुगत आहे. त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपचे डॉ अभिजीत मोरे (Dr. abhijit more) यांनी केली. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी 200 युनिट वीज मोफत द्यावी अशी मागणी  करण्यात आली.

हेही वाचा - MSEDCL News | वारजे माळवाडी मधील विस्कळीत वीज पुरवठ्यावर महावितरणचा पालिका प्रशासन आणि ठेकेदाराला शॉक

आजच्या आंदोलनात विजय कुंभार, मुकुंद किर्दत, डॉ अभिजीत मोरे, सुजीत अग्रवाल, आनंद अंकुश, शेखर ढगे, अक्षय दावडीकर, किरण कांबळे, मीरा बिघे, मनोज फुलावरे, किशोर मुजुमदार, धनंजय बेनकर, निलेश वांजळे, प्रभाकर कोंढाळकर, किरण कद्रे, समीर आरवडे, सुनंदा जाधव, सचिन भोंडे, शिवाजी डोलारे, शंकर ठाकर, सतिश यादव, प्रशांत कांबळे, भानुदास रायकर, अविनाश भाकरे, शाहबाझ मेमन, शाहीन मेमन, मनोज शेट्टी, हेमंत बिघे, वीरेंद्र बिघे, सुरेखा भोसले, सुनिता काळे, प्रीती निकाळजे, अजय पैठणकर, संजय कोणे, प्राजक्ता देशमुख, विजय साठे, रवींद्र चोरगे, सारिका भंडारी, सुधाकर गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, राकेश कोकाटे, रमेश राठोड, अमित म्हस्के, अनिल धुमाळ, मिताली वडावराव, रमेश पाडळे, अल्ताफ शेख हे लोक उपस्थित होते.

यासोबतच गणेश मोरे, जोगिंदर पाल तुरा, रवी लाटे, सुनिल भोसले, सचिन कोतवाल, बापू राईसिंग, संजय कतारनवरे, प्रकाश शेरीकर, निरंजन अडागळे, राहुल कांबळे, सुभाष जाधव, शब्बीर शेख, गोपाळ जांगमल्ले, फहीम खान, रोहन रोकडे, साजिद खान, वैशाली डोंगरे, शंकर थोरात, इकबाल तांबोळी, हर्षल भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, निखिल देवकर, आरती करंजावणे, ज्योती ताकवले, निखिल खंदारे, ऋषिकेश मारणे, जय गिडवानी, आफताब शेख, सीमा गुट्टे,सचिन मोरे, आसिफ बागवान, माधुरी गायकवाड, मिलिंद ओव्हाल, रमेश मते, सर्फराज मोमीन, अश्विनी सुरवसे, दिलीप गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही सामील झाले होते.

हेही वाचा - महावितरणचा उपजिल्हा रुग्णालयाला देखील दणका; वीजबिल थकल्याने बंद केले कनेक्शन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.