Type Here to Get Search Results !

Pune Crime: भर दिवसा ४७ लाखांची रोकड लुटलेल्या त्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

accused arrested who stole cash from businessman - checkmate times

पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भरदिवसा व्यापाऱ्याला भररस्त्यात मारहाण करून 47 लाखांची रोकड लुटणाऱ्या (Robbed) तिघा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून 30 लाखांची रोकड जप्त केली असून गुन्हे शाखा आणि फरासखाना विभागाने ही संयुक्त कारवाई केली गेली. (Pune Crime News)

मंगलपुरी गोस्वामी (Mangalpuri Goswami) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. किरण अशोक पवार (Kiran Ashok Pawar) (वय 27), आकाश कपिल गोरड (Akash Kapil Gorad) (वय 21) आणि ऋषीकेश गायकवाड (Hrishikesh Gaikwad) (वय 24, तिघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नाना पेठेतील (Nana Peth) पन्ना एजन्सीत (Panna Agency) कामगार आहेत. ते 23 मार्च 2023 ला बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात होते. त्यावेळी चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 47 लाखांची रोकड हिसकावून नेली होती. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास फरासखाना विभाग आणि गुन्हे शाखेकडून (Faraskhana Division and Crime Branch) सुरू होता. (Pune Crime News)

गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील पवार (Assistant Commissioner of Crime Branch Sunil Pawar) यांच्या सूचनेनुसार युनिट - एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी किरण पवार आणि त्याचा साथीदार आकाश गोरड यांनी हा गुन्हा केल्याची माहिती सहायक फौजदार राहुल मखरे (Rahul Makhare) आणि पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे (Police Constable Datta Sonwane) यांना मिळाली. त्यानुसार दोघा आरोपींना अटक करून पाच लाख रुपये जप्त केले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner Ram Nath Pokle), उपायुक्त अमोल झेंडे (Deputy Commissioner Amol Zende) आणि सहायक आयुक्त सुनील पवार (Assistant Commissioner Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद (Unit One Senior Inspector Shabbir Sayyed) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तसेच, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर (Assistant Commissioner of Faraskhana Department Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलिसांना घटनास्थळी संशयित रिक्षा फिरताना आढळून आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे (Assistant Inspector Prasad Lowane) आणि त्यांच्या पथकाने रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. रिक्षातील व्यक्ती गायकवाड हा आरोपींचा मित्र असल्याचे समोर आले. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner Rajendra Dahale), परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (Circle One Deputy Commissioner of Police Sandeep Singh Gill आणि सहायक आयुक्त गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे (Samarth Senior Inspector Ramesh Sathe), प्रमोद वाघमारे (Pramod Waghmare) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ऋषीकेश गायकवाड हा या एजन्सीकडे सेल्समन म्हणून कामास होता. त्याला कामावरुन काढले होते. त्याला फिर्यादी रक्कम भरण्यासाठी बँकेत कधी जातात याची माहिती होती. गायकवाड हा मास्टरमाइंड असून, त्याच्या एकट्याकडून 25 लाखांची रोकड जप्त केल्याचे फरासखानाचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले. सहायक आयुक्त सुनील पवार आणि गोवेकर यांनी आत्तापर्यंत शहरातील महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.

हेही वाचा - Pune Crime: मॉर्निंग वॉकला जाताना मौल्यवान दागिने घालून जाऊ नका; एकाच तासात 4 जणांना झटका

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.