Type Here to Get Search Results !

Shirur News: पुणे जिल्ह्यातील या मोठ्या 24 शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर; कधीही लागू शकते कुलूप?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

action against schools in shirur - checkmate times

पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे (Dattatreya Ware, Headmaster of Wablewadi) यांचे ज्या कारणांनी निलंबन (Suspension) झाले त्याच कारणांसाठी शिरूरमधील 24 मोठ्या शाळाही आता कारवाईसाठी पात्र आहेत. गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी काल (दि. 28 मार्च 2023) तातडीने वाबळेवाडी ग्रामस्थांना शिरूरमध्ये बोलावून बैठक करून ग्वाही दिल्याने पावणे दोन वर्षांपूर्वी एका कारवाईने जात्यात भरडलेल्या वाबळेवाडी शाळेमागे तालुक्यातील 24 शाळा सुपात पाखडायला सुरवात झाली आहे.

या 24 शाळांवर कारवाई करणार का म्हणून आत्मदहनाचा इशारा दिल्याने शिरूर पंचायत समितीने तातडीने चौकशी समिती नेमली व चर्चेसाठी काल बोलविले. या सर्व शाळांची पुन्हा खातेनिहाय चौकशी करून संपूर्ण अहवाल कारवाईसाठी पुणे जिल्हा परिषदेकडे सादर केला जाणार असल्याची ग्वाही आंदोलकांना शिरूर पंचायत समितीने (Shirur Panchayat Samiti) दिली.

पावणे दोन वर्षांपूर्वी वाबळेवाडी (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेची अचानक चौकशी करून तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांचे निलंबन करण्यात आले. पुढील पावणे दोन वर्षात पुणे जिल्हा परिषदेला काहीही सिद्ध करता आले नसले तरी शिरूरमधील 24 शाळांमध्ये तर वाबळेवाडीपेक्षा गंभीर परिस्थिती असल्याचे चित्र वाबळेवाडीकरांनी वाबळेवाडी शाळा कारवाई प्रकरणातील मुद्द्यांच्या आधारे उघडकीस आणले.

हेही वाचा - आमदाराशी असभ्य वर्तन करणे पडले महागात; सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी 25 एप्रिलपर्यंत सर्व 24 शाळांची, तेथील मुख्याध्यापकांची तसेच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची खातेनिहाय चौकशी करून तो कारवाईसाठीचा अहवाल पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविणार असल्याची ग्वाही दिल्याची माहिती आंदोलक सतीश वाबळे (Satish Wable), खंडू वाबळे (Khandu Wable), सत्यवान कोठावळे (Satyavan Kothavale) व प्रकाश वाबळे (Prakash Wable) यांनी दिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.