Type Here to Get Search Results !

सोलापूर रस्त्यानंतर नाशिक रस्त्यावर देखील अफूच्या शेतीचे फॅड; एक शेतकरी गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

afu farming near aambegaon - checkmate times

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): लांडेवाडी, पिंगळवाडी (ता. आंबेगाव) (Landewadi, Pingalwadi, Aambegaon) येथे विनापरवाना अंमली पदार्थ अफूच्या झाडांची लागवड केल्याप्रकरणी बन्सीलाल गेनभाऊ हुले (वय 73 वर्ष) यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon Police Station) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने (Assistant PI Jeevan Mane) यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, लांडेवाडी पिंगळवाडी गावच्या हद्दीत बन्सीलाल हुले (bansilal hule) यांनी अफूच्या झाडांची लागवड केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलीस जीवन माने यांनी पथकासह येथे छापा (Raid) टाकला. यात 2 किलो 400 ग्रॅम वजनाचा माल शेतात मिळून आला. याची बाजारभावात अंदाजे किंमत 12 हजार 200 रूपये आहे.

दरम्यान, काल सायंकाळी 5:30 च्या सुमारास लांडेवाडी पिंगळवाडी गावच्या हद्दीत कोंडीभाऊ मारूती हुले (Kondibhau Maruti Hule) यांच्या गट नं 347 वरील शेतात ही झाडे आढळली. आरोपी बन्सीलाल हुले यांनी ही जमीन मक्त्याने करत आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण (Sub-Inspector of Police Anil Mahadev Chavan) यांनी पोलीस ठाण्यात दिली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal), अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे (Upper Superintendent of Police Mitesh Ghatte), उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील (Sub Divisional Officer Sudarshan Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, किरण भालेकर, अनिल चव्हाण यांनी पार पाडली.

हेही वाचा - Pune Crime News: सर्वांच्या नजरेआड अफूची शेती; कोणत्या शेतकऱ्यांच्या या करामती?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                         

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                 

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.