Type Here to Get Search Results !

Mulshi Crime News | पौड पोलिसांचा अमेरिकेत डंका; १२ दिवसांत डॉलर चोरीचा लावला छडा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

american woman found her lost money mulshi crime news paud police 

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे येथील 'आत्‍मंथन' (Atmanthan) येथे पाहुण्‍या आलेल्‍या अमेरिकी महिलेचे चोरीला गेलेले पाच हजार नऊशे त्रेचाळीस अमेरीकी डॉलर (American Dollars) चोरीचा छडा पौड पोलिसांनी लावुन अमेरिकी महिलेला परत मिळवुन दिले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्‍यात आली आहे. या डॉलर्सची भारतीय रुपयांमध्‍ये सुमारे चार लाख सत्‍याऐंशी हजार तीनशे सव्‍वीस रुपये इतकी किंमत होत आहे. चोरीला गेलेली रक्‍कम परत मिळाल्‍याने परदेशी महिलेने पौड पोलिसांचे आभार मानले. (american woman found her lost money)

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी जमीना करीम (Bibi Jamina Karim) (रा. अमेरीका, न्‍युयॉर्क, गयाना सिटी) या 25 फेब्रुवारी 2023 रोजी पळसे (Palase) येथील आत्‍मंथन येथे पाहुण्‍या म्‍हणुन आल्‍या होत्‍या. येथील मुक्‍कामा दरम्‍यान त्‍यांच्‍याकडचे 5943 अमेरीकी डॉलर चोरीला गेल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. ही बाब त्‍यांनी व्‍यवस्‍थापनाला (Management) कळवली. याबाबत त्‍यांचेवतीने आत्‍मंथनचे सिक्‍युरीटी इंचार्ज भालचंद्र श्रीधर जाधव (Atmanthan Security Incharge Bhalchandra Shridhar Jadhav) यांनी (दि. 26 फेब्रुवारी 2023) पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांत तक्रार दाखल होताच पौडचे पोलीस स्‍थानकाचे पोलीस निरीक्षक मनोज यादव (Police Inspector Manoj Yadav of Paud police station) यांनी तात्काळ घटनास्‍थळी भेट दिली. तातडीने तपासपथक नेमुन तपासाबाबत सूचना दिल्या. या ठिकाणी कामास असलेला विजय पटोई (Vijay Patoi) (रा. मुंबई टीटवाला) याला ताब्‍यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवत सखोल चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

त्‍यामुळे आरोपी विजय यास पोलीस कस्टडी (Police Custody) घेऊन चोरीचा तपास पुर्ण करण्‍यात आला. आरोपी विजय कडुन 5943 अमेरिकी डॉलर हस्‍तगत करण्‍यात आले. आरोपी विजय यास कोठडी देण्‍यात आली. प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी, शिवाजीनगर नंबर 7, पुणे यांच्‍या आदेशानुसार काल बुधवारी (दि. 8 मार्च 2023) बीबी जमीना करीम यांना त्‍यांचे अमेरिकी डॉलर परत करण्‍यात आले. अवघ्‍या 10-12 दिवसांत चोरीचा तपास, न्‍यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन चलन परत केल्‍याबददल जमीना करीम यांनी पौड पोलिसांचे आभार मानले.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal), अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश गट्टे (Upper Superintendent of Police Pune Division Mitesh Gatte), हवेली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील (Haveli Division Sub Divisional Police Officer Bhausaheb Dhole Patil), पोलीस निरीक्षक मनोज यादव (Police Inspector Manoj Yadav) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे (Assistant Police Inspector Bhalchandra Shinde), सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार (Assistant Sub-Inspector Santosh Kumhar), पोलीस हवालदार रॉकी देवकाते (Police Constable Rocky Devkate), पोलीस नाईक नामदेव मोरे (Police Naik Namdev More), दत्तात्रय अर्जुन (Dattatray Arjun), पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख (Police Constable Sahil Sheikh), आकाश पाटील (Akash Patil), अक्षय यादव (Akshay Yadav) यांच्‍या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - ..अखेर तिचे दागिने सापडले; ऑस्ट्रेलियन महिलेने फरासखाना पोलिसांचे मानले आभार

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.