Type Here to Get Search Results !

वा रे कलियुग; घरच्या कारभाऱ्याला दोन मुलांनी संपवले, कपाळाचे कुंकू पुसून पत्नीने केला पुरावा नष्ट

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 8 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): दिघी (Dighi) येथे प्रेयसीबाबत वाईट शब्द उच्चारल्याच्या रागातून मुलानेच वडिलांचा गळा आवळून खून केला. दुसऱ्या मुलाने गळफास घेतल्याचा बनाव रचला तर मृताच्या पत्नीने पुरावा नष्ट केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. अशोक रामदास जाधव (Ashok Ramdas Jadhav) (वय 45, रा. दिघी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. (pune crime news)

हेही वाचा - पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून एकाचा खून; खून करणाऱ्यानेही स्वतःवर केला वार

याप्रकरणी दिघी पोलिसांनी अशोक यांचा मोठा मुलगा राहुल अशोक जाधव (Rahul Ashok Jadhav) (वय 25) व लहान मुलगा अनिल अशोक जाधव (Anil Ashok Jadhav) (वय 23) व अशोक यांच्या पत्नीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या तरुणीबाबत त्याचे वडील अशोक यांनी वाईट शब्द उच्चारले. याचा राग आल्याने अनिलने घरातील दोरीच्या सहाय्याने वडिलांचा गळा आवळून खून केला. त्यावेळी अशोक यांच्या नाक तोंडातून फरशीवर पडलेले रक्ताचे डाग त्यांच्या पत्नीने त्यांच्या अंगातील शर्टने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. (pune crime news)

हेही वाचा - ९ महिन्यांपूर्वी वकिलाचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पौड पोलिसांना यश

तसेच मोठा मुलगा राहुल याने घरातील दोरी फॅनला गुंडाळून अशोक यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. (fake suicide) दिघी पोलिसांनी तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता 10 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com             

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes           

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/           

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times          

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes           

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes         

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes        

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.