Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या (Hadapsar) आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हडपसरच्या 32 नंबर शाळेजवळ बुधवारी (दि. 29 मार्च 2023) हा प्रकार घडला. (Pune Crime)
प्रदीप दिनकर देवकर (Pradeep Dinkar Devkar) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम उर्फ पिंटू भंडारी (Om alias Pintu Bhandari) (वय 23), सागर घायतडक (Sagar Ghaytadk) (वय 19), राजन लावंड (वय 22) आणि मेघराज शितोळे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पहिले तीन आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम भोंडे हा 2020 मध्ये झालेल्या अनिकेत शिवाजी घाईतडक (Aniket Shivaji Ghaitadak) यांच्या खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये (Jail) होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. बुधवारी फिर्यादी हे मित्र शुभम भोंडे यांच्यासोबत रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी आरोपी दोन दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. आरोपींनी त्याला रिक्षातून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
‘तू (Hadapsar) अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार, आज तुला कायमचे संपूनच टाकणार.’ असे बोलून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यामध्ये शुभम भोंडे हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - Koyta Gang: कोयता गँग’ची कोंढवे धावडे मध्ये भाईगिरी; धारदार शस्त्रे दाखवून नागरिकांमध्ये पसरवली दहशत
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84