Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये सहा महिन्यांपासून पडले आहे बस स्टॉपचे ग्रील; ना पालिकेचे लक्ष्य, ना पीएमपीएमएल’चे, ना भंगार वाल्याचे

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील अतुलनगर (Atulnagar) भागात असलेल्या बस स्टॉपचे ग्रील गेल्या सहा महिन्यांपासून पडले असून, एकीकडे विकासकामांच्या नावाखाली कोट्यावधींची उधळपट्टी सुरु असताना, ते किरकोळ काम करण्यास पुणे महानगरपालिका (PMC) असेल, की पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाला वेळ नसल्याचे समोर येते आहे. (pune news)

checkmate times ads

atulnagar road pune - checkmate times

इतर वेळी लोखंडाच्या सरकारी वस्तू रातोरात भंगारात जात असताना, हे स्टेनलेस स्टीलचे ग्रील मात्र सहा महिन्यांपासून अनेक बेवड्यांच्या नजरेत येऊनही भंगारात गेलेले नाही. आपण आमच्याच कॅमेऱ्यातून काढलेल्या पहिल्या छायाचित्रात टाईम स्टँप’सह पाहू शकता, हे छायाचित्र 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजून 04 मिनिटांनी काढलेले आहे. तेव्हा पावसाळा असल्याने छायाचित्रात हिरवळही दिसते आहे, रस्त्याने वाहणारे पाणी देखील दिसत आहे.

atulnagar road - checkmate times

तर दुसऱ्या छायाचित्रात देखील आपण टाईम स्टँप’सह पाहू शकता, आता उन्हाळ्याच्या झाला सुरु झाल्या असून, हे छायाचित्र 12 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी काढलेले आहे. एकूणच पुढच्या 10 दिवसांमध्ये पडलेल्या या ग्रीलचे छायाचित्र काढून 6 महिने पूर्ण होतील. तर ग्रील पडल्यावर एक आठवडा उलटला, तरी ग्रील पुन्हा लावले जात नसल्याने, हे छायाचित्र काढून, पालिकेच्या अधिकाऱ्यांना दुरुस्ती करिता “चेकमेट टाईम्स”च्या माध्यमातून पाठवण्यात आले होते.

मात्र त्याला आता सहा महिने उलटले तरी पुणे महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरील पडलेले ग्रील कसे दिसले नाही? दररोज झाडण काम ज्यांच्या देखरेखीखाली होत असते, त्या या विभागाच्या आरोग्य निरीक्षकांनी या बाबत क्षेत्रीय कार्यालयाला किंवा पथ विभागाला कळवले का? या बस स्टॉप’वर दररोज थांबणाऱ्या बसच्या चालक किंवा वाहकांनी आगार व्यवस्थापकांना याबाबत कळवले नाही का? समोरच राघवदास विद्यालयाच्या चौकातून प्रवास करणाऱ्या तथाकथित समाजाचे काम करण्याचा आव आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना (Social Workers) हे काम सामाजिक वाटले नाही का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून, ते भंगारात जाण्यापूर्वी तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

हेही वाचा - दुसऱ्याला शिकवावे तत्वज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण; सरकारी वाहनांचे हे आहेत अक्षम्य अपराध

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.