Type Here to Get Search Results !

पुणे मनपा शाळांच्या गैरसोयीवरून सुरु झालेले ते उपोषण यशस्वी; मागण्या झाल्या मान्य

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 11 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बालेवाडी (Balewadi) येथील मनपा (PMC) शाळा क्रमांक 152 व 121 कै. बाबुराव गेनुजी बालवडकर शाळेत (Baburao Genuji Balwadkar School) जवळजवळ 1600 पटसंख्या असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार सूचना देऊनही फरक पडत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (दि. 9 मार्च 2023) रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पण याची दखल कोणीही अधिकाऱ्यांनी न घेतल्याने पुढे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. (Pune News)

परंतु मनपा शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत (Municipal Education Chief Meenakshi Raut) यांनी स्वतः शाळेत येऊन शाळे संदर्भातील मागण्याबद्दल लेखी आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे उपोषण शाळेतल्या मुलांकडून नारळ पाणी देऊन मागे घेण्यात आले.

बालेवाडी येथील म.न.पा.च्या कै. बाबुराव बालवडकर शाळेत पट संख्या चांगली आहे. परंतु मुलांना बसायला वर्ग कमी आहेत, पाणी वेळेवर व पुरेसे नाही त्यामुळे स्वच्छतेचा अभाव, अपूरे स्वच्छतागृह, शिक्षक कमी आहेत, शिपाई कमी असल्यामुळे मुलांना शाळेची साफसफाई करावी लागते, खेळासाठी मैदान नाही अशा अनेक समस्या असल्याने बालेवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर (Prakash Balwadkar, Regional Vice President of Swabhimani Farmers Association) यांनी याविषयी शिक्षण विभाग (Education Department) तसेच महापालिका आयुक्त (Municipal Comissioner) यांना निवेदन दिले होते, परंतु त्यावर काहीच उपाय योजना न झाल्याने त्यांनी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली.

परंतु याची दखल कोणीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न घेतल्याने बालवडकर यांनी (दि. 9 मार्च 2023) रोजी आमरण उपोषण सुरू केले. शाळेतली मुलं व त्यांचे पालकही काही काळ या उषणामध्ये सहभागी झाले. 10 मार्च 2023 हा उपोषणाचा दुसराच दिवस होता, याभागातील सर्व राजकीय पक्ष, प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी येऊन या उपोषणास पाठिंबा दिला. या उपोषणाची दखल घेऊन शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी स्वतः बालेवाडी येथे येऊन शाळेविषयी ज्या काही मागण्या आहेत, त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, शाळेतील लहान मुलांकडून नारळ पाणी देऊन बालवडकर यांनी उपोषण मागे घेतले.

बालवडकर यांच्या पत्नी शोभा यांनी ही घरी उपोषण केले होते, त्यांनीही यावेळी हे उपोषण सोडले. यावेळी साहाय्यक प्रशासकीय अधिकारी औंध - सुरेश उचाळे (Assistant Administrative Officer Suresh Uchale), बाणेरचे माजी प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर (Former first corporator of Baner Dnyaneshwar Tapkir), अशोक मुरकुटे (Ashok Murkute), प्रकाश दशरत बालवडकर (Prakash Dahashat Balwadkar), माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Former corporator Amol Balwadkar), गणेश कळमकर (Ganesh Kalamkar), प्रल्हाद सायकर (Pralhad Saykar), लहू बालवडकर (lahu Balwadkar), हनुमंत बालवडकर (Hanumant Balwadkar), दिलीप बालवडकर (Dilip Balwadkar) चतुशृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (Chatushringi Police Station Assistant Police Inspector Rajkumar Kendra), शाळेच्या मुख्याध्यापिका पार्वती गोडे (School Principal Parvati Gode) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

“शिक्षण विभागाला ही अनेक कामासाठी मनपा च्या इतर विभागावर अवलंबून रहावे लागते, पाठ पुरावा करावा लागतो. या शाळेसाठी प्रशस्थ मैदान, व नविन इमारतीसाठी या भागामध्ये शाळेसाठी जी आरक्षित जागा आहे, त्या संदर्भात भवन विभाग व अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शालेय विभागाच्या अखत्यारीत जे विषय असतील ते प्राधान्याने सोडवले जातील. यासंदर्भात या ठिकाणी लेखी निवेदन देण्यात आले आहे.” असे शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत यांनी सांगितले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                   

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                 

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                 

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                 

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes               

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes              

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.