Type Here to Get Search Results !

Pune news | पुणे मनपाच्या शाळेच्या दुरावस्थेला वाचा फोडण्यासाठी बालेवाडी मध्ये उपोषण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): बालेवाडी (Balewadi) येथील मनपा (PMC) शाळा क्रमांक 152 व 121 कै. बाबुराव गेनुजी बालवडकर शाळेत (Baburao Genuji Balwadkar School) जवळजवळ 1600 पटसंख्या असूनही या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार निवेदन देऊनही फरक पडत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने (दि. 10 मार्च 2023) रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. पण याची दखल कोणीही अधिकाऱ्यांनी न घेतल्याने संध्याकाळी 5 नंतर आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.

बालेवाडी येथील म. न. पा. च्या कै. बाबुराव बालवडकर शाळेत पट संख्या चांगली आहे. परंतु मुलांना बसायला वर्ग कमी आहेत, पाणी वेळेवर व पुरेसे नाही त्यामुळे स्वच्छतेचा अभाव (untidy), अपुरे स्वच्छतागृह संख्या, शिक्षक कमी आहेत, शिपाई कमी असल्यामुळे मुलांना शाळेची साफसफाई करावी लागते. त्यामुळे बालेवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर (Prakash Balwadkar, Regional Vice President of Swabhimani Farmers Association) यांनी याविषयी शिक्षण विभाग (Education Department) तसेच महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यांना निवेदन दिले आहे.

परंतु काहीच सुविधा न मिळाल्याने (दि. 9 मार्च 2023) रोजी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात केली. परंतु याची ही दखल कोणीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (Senior Officers) न घेतल्याने त्यांनी आज आमरण उपोषण सुरू केले असल्याचे सांगितले.

“सदर शाळेमधील कर्मचारी व सेविका संख्या कमी होत्या, त्या वाढवण्यात आल्या आहेत. आणखी काही अडचणी असतील तर त्याही सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.” औंध येथील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे (Assistant Administrative Officer Suresh Uchale) यांनी सांगितले.

हेही वाचा - अल्प उत्पन्नाचा दाखला दाखवून सवलती मिळवणाऱ्यांवर कारवाई करा; राईट टू एज्युकेशन मूव्हमेंटची मागणी

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times               

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes              

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n                 

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes             

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.