Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

bhalchandra kulkarni death news - checkmate times

पुणे, दि. 18 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (bhalchandra kulkarni death) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शनिवारी (दि. 18 मार्च 2023) सकाळी 6 वाजता त्यांची प्राणज्योत माळवली. दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोल्हापूर - कळंबा (Kolhapur-Kalamba) येथील शिवप्रभू नगर (Shivprabhu Nagar) येथील त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी 11:30 च्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे. (actor death news)

भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (1983) (Mardani movie), मासूम (1996) (Masoom), झुंज तुझी माझी (1992) (Zunj Tujhi Majhi), हळद रुसली कुंकू हसलं (1991) (Halad Rusli Kunku Hasala), माहेरची साडी (1981) (Maherchi Sadi) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई (Navara nako g bai), सोंगाड्या (Songadya), पिंजरा (Pinjara), थरथराट (Thartharat), मुंबईचा जावई (Mumbaicha Javai), खतरनाक (Khatarnak) या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

कुलस्वामिनी अंबाबाई (Kulswamini Ambabai) चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ (changbhala r deva song) हे गाणं त्यांच्या चित्रित झाले होते. हे गाणे खूप गाजलं होतं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे (All India Marathi Film Corporation) त्यांना चित्रभूषण पुरस्काराने (chitrabhushan award) गौरवण्यात आले होते.

हेही वाचा - बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                           

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes                 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.