Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 24 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यातील (Pune) नद्यांच्या लगतच्या शहरांचे सांडपाणी कोणत्याही नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्याबाबत तसेच खडकवासला धारणा (Khadakwasla Dam) जवळच्या गावांचे सांडपाणी (Waste Water) धरणात सोडले जाणार नाही, याबाबत काळजी घेण्याबाबत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाला (Pune Metropolitan Regional Development Authority - PMRDA) आदेश देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिले. खडकवासला धरणालगतच्या 23 गावांचे सांडपाण्याबाबत विकास आराखडा तयार करण्याबाबतही ‘पीएमआरडीए’ला निर्देश देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिक्रमणे वाढत असून याठिकाणच्या वस्त्यांचे सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याबाबत खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर (Khadakwasla MLA Bhimrao Tapkir) आणि दौंडचे राहुल कुल (Rahul Kul of Daund) यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. खडकवासला धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, मात्र या धरणात सभोवतालच्या वस्त्यांमधील सांडपाणी सोडले जाते. त्यातील 80 टक्के पाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. पर्यायाने धरणातील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे.
त्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेली बांधकामे ही नियमाप्रमाणे झाली आहेत का, तसेच भूमिअभिलेख आणि जलसंपदा विभाग (Department of Land Records and Water Resources) यांनी कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची मोजणी केली आहे का, अशी विचारणा तापकीर यांनी सभागृहात केली.
धरणाच्या कालव्याची संपादित केलेल्या जागेवर अतिक्रमणे वाढली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती नियमित करण्याबाबत सूचना कुल यांनी यावेळी केली. तर पुणे जिल्ह्यातील अन्य धरणाबाबतही सांडपाणी थेट नदीत किंवा धरणात न सोडण्याबाबत ‘पीएमआरडीए’ला (PMRDA) तसे निर्देश द्यावेत, अशी सूचना सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केली. या सर्व बांधकामांच्या मालकांना शून्य डिस्चार्ज करण्याबाबतचे आदेश देण्याबाबत पीएमआरडीएला निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - Khadakwasla Dam: सांडपाणी प्रदूषित करतंय धरणांचे पाणी; यावर उपाय काढण्याची पवारांची मागणी
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84