Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील भाजीबाजार (Pune Bhajibajar) परिसरात एकाने दुचाकीसह अंगावर आलेल्या तरुणांना गाडी सावकाश चालवा असे म्हणाल्याने झालेल्या भांडणाचा तिघांनी राग मनात धरला आणि त्याला मारहाण करीत त्याची दुचाकी पेटवून (bike set on fire after fight) दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28 मार्च 2023) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. (Pune Crime News)
याप्रकरणी लतीफ अस्लम तांबोळी (Latif Aslam Tamboli) (रा. हल्दी मोहल्ला, शिरूर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून शिरूर पोलिसांनी भास्कर दत्तात्रेय घोडके (Bhaskar Dattatrey Ghodke), जितेंद्र ऊर्फ मोग्या भास्कर घोडके (Jitendra alias Mogya Bhaskar Ghodge) व जुबेर (पूर्ण नाव नाही) (Jubair) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, लतीफ तांबोळी हे हलवाई चौकातून (Halwai Chowk) जात असताना त्यांनी घोडके बंधू व जुबेर यास गाडी सावकाश चालवा, असे म्हणाल्याने त्यांच्यात भांडणे झाली. याच भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तांबोळी यांना मारहाण केली व भाजीबाजार परिसरात लावलेली त्यांची ॲक्टिव्हा पेटवून दिली. त्यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. (Pune Crime News)
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84