Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्ता (Sinhagad Road) पोलिसांनी धायरी फाट्याजवळ (Dhayari Phata) एका दुचाकी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी या परिसरातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्याच्या ताब्यातून 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. रोहन महेंद्र देवरकर (Rohan Mahendra Devarkar) (वय 19, रा. पोकळेनगर, सरडेबाग, उत्तमनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (pune crime news)
हेही वाचा - दिवसा टँकरचालक, रात्री वाहन चोर; दरोडा पथकाच्या कारवाईत 9 दुचाकी, मोबाइल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत होणाऱ्या वाहनचोरीच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी आबा उत्तेकर (Police Constable Aba Uttekar), शिवाजी क्षीरसागर (Shivaji Kshirsagar) आणि राहुल ओलेकर (Rahul Olekar) यांना वडगाव पुलाखाली (Wadgaon Bridge) धायरी फाट्याजवळ एकजण केसरी रंगाच्या यामाहा (Yamaha) दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली.
सहायक निरीक्षक सचिन निकम (Assistant Inspector Sachin Nikam) यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रे आणि परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.
हेही वाचा - कोथरुड पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्यास बेड्या ठोकण्यात यश
परंतु चौकशीदरम्यान त्याने ही दुचाकी हॅप्पी कॉलनी (Happy Colony), वडगाव (Vadgaon) येथून आणि त्यासोबतच सिंहगड रोड (Sinhagad Road), वारजे माळवाडी (Warje Malwadi), उत्तमनगर (Uttamnagar), लोणी काळभोर (Loni Kalbhor) आणि वडगाव परिसरातून आठ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर (Senior Police Inspector Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निकम करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84