Type Here to Get Search Results !

इंदापूर मध्ये वीज पडल्याने शेतात काम करत असलेल्या तरुणाचा भाजून दुर्दैवी मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

 

पुणे, दि. 9 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): इंदापूर (Indapur) तालुक्यातील काटी (Kati) येथे मंगळवार (दि. 7 मार्च 2023) रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान शेतात काम करीत असताना वीज कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.

ओंकार दादाराम मोहिते (Omkar Dadaram Mohite) (वय 22 वर्षे, रा. काटी भरतवाडी ता. इंदापुर) असे मयताचे नाव आहे. याबाबत मयताचे चुलते तुकाराम भिवा मोहिते (Tukaram Bhiva Mohite) (वय 41 वर्षे, व्यवसाय शेती रा. काटी भरतवाडी ता. इंदापुर) यांनी फिर्याद दिली.

तुकाराम भिवा मोहिते यांनी सांगितले कि,“मंगळवार काटी येथे दादाराम मोहिते यांच्या शेत जमिन गट नंबर 593 मध्ये चुलत पुतण्या ओंकार मोहिते मका पिकाला पाणी देण्याचे काम करीत होता. यावेळी वादळी वा-यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यामुळे चुलत पुतण्या ओंकार याला घरी चल पाऊस येईल असे म्हणालो.

त्यावेळी पुतण्या ओंकार हा मला म्हणाला की,’तुम्ही पुढे जावा, तुमच्या पाठीमागे मी घरी येतो.’ त्यानंतर मी तेथुन माझे घरी आलो. तेव्हा अचानक मोठ्याने विज कडाडलेला आवाज आला. त्यामुळे मी घराचे बाहेर येवुन पाहिले असता आमचे भावकीतील मनाल मोहिते याचे शेताचे बांधावर असलेल्या नारळाचे झाड पेटुन आग लागली होती.

तेव्हा मी तसेच माझी वहिनी शोभा दादाराम मोहिते, माझा चुलत भाऊ निलेश मधुकर मोहिते व आमचे भावकीतील इतर लोक पळत माझा चुलत भाऊ दादाराम मोहिते याचे शेतात जावुन पाहिले असता माझा पुतण्या ओंकार मोहिते हा त्यांच्या शेतात पडला होता. त्याचे अंगावरील टी शर्ट जळालेला दिसला त्यावेळी त्याची काहीएक हालचाल होत नव्हती.

तेव्हा त्यास सर्वांनी मिळुन चारचाकी गाडीतुन औषधोपचारकामी उपजिल्हा रुग्णालय इंदापुर येथे दाखल केले असता तो औषधोपचारापुर्वीच मयत झाल्याबाबत सांगितले.” यावरून इंदापूर पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार (police inspector Dilip Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन बोराडे (Police Constable Sachin Borade) करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.