Type Here to Get Search Results !

Pune Accident: तिरुपती बालाजीला जात असलेल्या पुण्यातील तरुणांच्या मोटारीचा बेंगलोर जवळ अपघात; एक जण ठार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 7 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): तिरुपती बालाजी (Tirupati Balaji) येथे देवदर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा (Theur Phata) येथील 19 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आणखी तिघेजण किरकोळ जखमी (injured) झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. हा अपघात शनिवारी 25 फेब्रुवारी 2023 ला झाला होता. अथर्व सचिन धुमाळ (Atharva Sachin Dhumal) (वय-19, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व आणि त्याचे मित्र हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात (chittur city, Andhra Pradesh) असलेले तिरुमाला तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला चारचाकी गाडीतून निघाले होते. कर्नाटक राज्यातील बेंगलोरच्याजवळ (Banglore) असलेल्या चित्रदुर्ग (Chitradurg) जवळील हिरीवूर (Hirivur) या गावाजवळ ते पोहोचले. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने जोरदार धडक (car collided with truck) दिली, अशी माहिती मिळाली आहे. अपघातात अथर्व याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला होता. त्याला तेथीलच एका खासगी रुगणालयात दाखल (private hospital) केले होते.

उपचार सुरू असताना शनिवारी (दि. 4 मार्च 2023) त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अथर्व याच्या जाण्याने कुंजीरवाडी (Kunjirwadi) परिसरावर शोककळा पसरली होती. येथील श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ (Sandeep Dhumal, President of Srinath Patsanstha) यांचा तो पुतण्या (nephew) होता.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com            आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes   आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times         आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n           

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.