Type Here to Get Search Results !

पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 6 लाख 81 हजारांचा ऐवज चोरीला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहरातील विविध भागांत घरे फोडून चोरट्यांनी सहा लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विश्रांतवाडी पोलीस वसाहतीतील (Vishrantwadi Police) दोघा पोलिसांच्या घरी देखील चोरट्यांनी डल्ला मारून रोकड व सोन्याचे दागिने चोरी केले आहेत.

विश्रांतवाडी पोलीस वसाहतीतील दोन सदनिकेतून चोरट्यांनी 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना 26 ते 27 फेब्रुवारी 2023 रोजी घडली आहे. या प्रकरणी, पोलीस कर्मचारी अल्लाउद्दीन मुसा सय्यद (Allauddin Musa Syed) (वय 27, रा. विश्रांतवाडी पोलीस वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा (burglary) गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत बिल्डिंग क्रमांक 1 मधील खोली क्रमांक दोनमध्ये राहतात. तर त्यांच्या शेजारी खोली क्रमांक 3 मध्ये पवन पवार (Pawan Pawar) राहतात. सय्यद हे कामावर गेले होते, तर पवन हे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. त्यामुळे दोघाच्या सदनिका बंद असताना चोरट्यांनी लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सय्यद यांच्या घरातून 33 हजार रुपये तर पवन यांच्या घरातून 93 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. (pune crime news)

सेंटर स्ट्रीट (Central Street) येथील एका एम्रायडरीच्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अब्दुल बारी कुरेशी (Abdul Bari Qureshi) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोहन खत्री (Moahan Khatri) (वय 70, रा. वानवडी विकासनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या दुकानाशेजारी असलेल्या दुकानाचा भाडेकरू कुरेशी याने त्यांच्या दुकानाचे लॉक तोडून दुकानातील एम्राडरीचे दोन मशीन, एक शिलाई मशीन, वॉल फॅन, टेबल फॅन व रोकड, ग्राहकांचा कपडा असा मुद्देमाल चोरी केला.

खराडी - थिटेनगर झेन्सॉर आयटी पार्क (Kharadi - Thitenagar zensor IT park) येथील प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी घरफोडी करून 2 लाख 9 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी दर्शना जागडे (Darshana Jagade) (वय 42) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:15 च्या सुमारास घडली आहे. फिर्यादी पत्नी व त्यांच्या मुलांसोबत चर्चला गेल्या होते. त्या वेळी चोरट्यांनी सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने व रोकड असा 2 लाख 9 हजारांचा ऐवज चोरी करून पोबारा केला.

याच दिवशी 6:30 वाजेच्या सुमारास तुकारामनगर खराडी येथील अ‍ॅरोमा रेसिडेन्सीमध्ये (Aroma Residency) घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 73 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, उज्वल रामदास शेळके (Ujwal Ramdas Shelke) (वय 32) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह भाजी खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरी करून पळ काढला. (pune crime news)

स्नेहविहार सोसायटी (Snehvihar Society) टेलिफोन एक्सचेंजशेजारी डी. पी. रोड औंध (D. P. Road Aundh) येथील एका सदनिकेत चोरट्यानी चोरी केली. तेथून सोन्याचे दागिने, विदेशी चलन, चारचाकी गाडीची चावी, चांदीची भांडी असा 83 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी, महेश मालुसरे (Mahesh Malusare) (वय 52) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ते 26 फेब्रुवारी 2023 रोजी घडली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.