Type Here to Get Search Results !

एनडीए मध्ये नोकरी लावण्याचे आमिष; लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 1 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): एन डी ए (NDA) मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावतो, तसेच इलेक्ट्रीक वर्क टेंडर मिळवून देतो, असे आश्वासन देऊन दोघांनी एकाची 28 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली. याप्रकरणी नर्‍हे (narhe) येथील एक 42 वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 117/23) दिली आहे. (Pune Crime News)

हा प्रकार नर्‍हे, शिंदेवाडी (shindewadi), शिवणे (shivane) येथे मे 2022 ते 15 ऑक्टोबर 2022 दरम्यान घडला. प्रसाद गोविंद वझे (Prasad Govind Vaze) (रा. लक्ष्मी पार्क सोसायटी, खडकमाळ, कोंढवे धावडे) आणि परमेश्वर अंकुश शिंदे (Parmeshwar Ankush Shinde) (रा. ब्रम्हा हॉटेलसमोर, सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. त्यांनी फिर्यादी यांची पत्नी व नातेवाईक यांना एनडीएमध्ये (NDA) कायमस्वरुपी नोकरी लावून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर इलेक्ट्रीक वर्क टेंडर (Electric Work Tender) मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे मिळून एकून 28 लाख रुपये घेतले. (pune crime news)

परंतु, त्यांना टेंडर मिळवून दिले नाही तसेच नोकरीही न लावल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी आता फसवणूकीची फिर्याद दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जाधव (Assistant Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.